- Marathi News
- सिटी क्राईम
- म्हणे, तो दारूच्या नशेत मंत्री शिरसाटांच्या ताफ्यात घुसला, त्याला वाटलं समोर रस्ताच आहे!
म्हणे, तो दारूच्या नशेत मंत्री शिरसाटांच्या ताफ्यात घुसला, त्याला वाटलं समोर रस्ताच आहे!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खतरनाक गुन्हेगार सौरभ अनिल भोले (वय २४, रा. समतानगर, क्रांती चौक) हा मंत्री संजय शिरसाटांच्या बंगल्यात शिरला, पोलिसांशी हमरीतुमरी केली... इथंपर्यंत ठीक आहे. पण त्यापुढचे दावे फोल ठरले आहेत. त्याच्या दुचाकीत चाकू आढळल्याने त्याच्यापासून मंत्री शिरसाटांना धोका होता, तो निघताना मोठे काम मिळाल्याचे मित्रांना म्हणाला, तो ताफ्यात शिरला, त्याचवेळी काही मिनिटांसाठी लाइट गेली, या अंधारात तो काहीतरी करणार होता... हे सगळं सगळं, आता जवळपास मनाच्या कहाण्या असल्याचे समोर येत आहे. थोडक्यात काय तर आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो दारूच्या नशेत मंत्री शिरसाटांच्या ताफ्यात शिरला. त्याला वाटले पुढे रस्ताच आहे!
३०-३० घोटाळ्यातील आरोपी पंकज जाधव नुकताच जामिनावर सुटला आहे. पंकजसोबत सौरभची हर्सूल जेलमध्ये ओळख झाली होती. पंकज आणि सौरभव आणि त्यांचे आणखी दोन मित्र यांनी सोबत दारूची पार्टी केली. नंतर ते थापटी तांडा (ता. पैठण) येथील कुलस्वामिनी कला केंद्रात गेले. तिथे ललनांवर पैसे उधळले. नंतर शिरसाट यांच्या बंगल्यामागे राहणाऱ्या पंकजच्या सोसायटीबाहेर रात्री १० ला सौरभ कारमधून उतरला. तिथे उभी केलेली दुचाकी घेऊन पडेगावच्या दिशेने निघाला. मात्र नशेत त्याला रस्ताच कळला नाही. शिरसाट यांचा ताफा निघाल्यानंतर त्याला पुढे रस्ताच असल्याचे वाटल्याने तो थेट ताफ्यात घुसला...
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
25 Jul 2025 22:12:45
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्त्याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्डा...