- Marathi News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ : ब्लॅकमेलर प्रेयसीची प्रियकराने केली निर्घृण हत्या!; पैशांसाठी बलात्...
छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ : ब्लॅकमेलर प्रेयसीची प्रियकराने केली निर्घृण हत्या!; पैशांसाठी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची देत होती धमकी, त्याने डोके दगडावर आपटून दौलताबाद घाटात फेकला मृतदेह

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैशांसाठी ब्लॅकमेल करून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीला संतप्त प्रियकराने डोके दगडावर आपटून ठार केले. त्यानंतर मृतदेह दौलताबाद घाटात फेकून देत स्वतः शिऊर पोलीस ठाण्यात येऊन हजर झाला. ही धक्कादायक घटना आज, २५ जुलैला सकाळी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
दोघेही नातेवाइक
दीपाली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. बलात्कारापेक्षा मर्डरचा गुन्हा परवडतो, म्हणून मारून टाकले, अशी कबुली सुनीलने शिऊर पोलिसांत दिली होती. मात्र दौलताबाद पोलिसांनी ती बोलत नव्हती, सोबत राहण्यास तयार नव्हती म्हणून मारले, अशी नोंद केली आहे. दीपाली ही सुनीलच्या भावजींची भाची आहे. सुनील अकरावीत शिकतो व बँड पथकात काम करतो. खून केल्यानंतर सुनील घरी गेला. वडिलांना दुचाकी, मोबाइल दिला. आंघोळ करून कपडे बदलून तो शिऊर पोलीस ठाण्यात निवांत हजर झाला. पहाटे अडीचला प्रेयसीचा खून करून आल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्यावर पोलीसही शॉक्ड झाले. हत्येनंतर सुनीलने इन्स्टाग्रामवर आनंदी चेहऱ्याचे स्टेटस ठेवले होते, हे विशेष.