६ सरकारी बाबूंची ऑन ड्युटी हॉटेलमध्ये ओली पार्टी!, सिंचन भवनातून निघाले ते बीड बायपासच्या हॉटेलमध्ये ‘रंगले’!!, प्रशासकीय वर्तुळात होतेय चवीने चर्चा

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिंचन भवनातील जलसंपदा विभागाच्या गुणनियंत्रण मंडळ कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांनी ऑन ड्युटी असताना बीड बायपासवरील एका हॉटेलवर झोडलेल्या ओल्या पार्टीची सध्या प्रशासकीय वर्तुळात ‘चवीने’ चर्चा सुरू आहे. दोन दिवस आधीच त्‍यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच गटारी साजरी केल्याने ते कारवाईच्या रडारवर आले आहेत.

गुणनियंत्रण अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत मराठवाड्यातील ८ व उत्तर महाराष्ट्रातील ५ असे १३ जिल्हे आहेत. कार्यालयप्रमुख अधीक्षक अभियंता विकास पाटील आहेत. ते सतत दौऱ्यावर असतात. कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्रे नसून, रजिस्टरवर हजेरी घेतली जाते. २८ पैकी १८ पदे सध्या भरलेली आहेत. त्‍यातील सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियम धाब्‍यावर बसवून हा प्रताप केला. मंगळवारी (२२ जुलै) दुपारनंतर ड्युटीवर असतानाच ते कार्यालयाबाहेर पडले.

बीड बायपासवरील एका हॉटेलमध्ये यथेच्‍छ ओली पार्टी केली. त्‍यांनी कार्यालयप्रमुखांची परवानगी घेतली नव्हती, असे समोर येत आहे. अर्थातच अशा कामासाठी परवानगी मिळणार नव्हतीच. कार्यालयाबाहेर गेलेले सहा जण दोन तास होऊनही परत न आल्याने अन्य एका अधिकाऱ्याने हजेरी रजिस्टर तपासून बुधवारी त्‍यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे सांगण्यात येते. आता अधीक्षक अभियंता विकास पाटील त्‍यांच्यावर काय कारवाई करतात, की तोंडी समज देऊन अभय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!

Latest News

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी! पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
ज्‍याला त्रास होत असेल तर त्‍याने येऊन खुर्चीला हार घाला म्‍हणताच, नागरिकांची उडाली झुंबड!; लाडसावंगीत हे काय भलतंच आंदोलन...
१७ वर्षीय मुलीला लाकडी छडीने बेदम मार!, विद्यादीप बालगृहातील सिस्टर मंगल शहाचा क्रूरपणा उघड
चंपा चौक ते जालना रोड रस्ता १०० फुटांचाच होणार, जी. श्रीकांत यांचा नागरिकांशी थेट संवाद, म्‍हणाले, कोणी अडथळा आणला तर सोडणार नाही!, हर्सूलमध्ये सोमवारपासून पाडापाडी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software