दोन महिलांची गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्‍नड तालुक्‍यात खळबळ

On

कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्‍नड तालुक्‍यात दोन महिलांनी राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याने खळबळ उडाली आहे. हतनूर  येथे ३० वर्षीय विवाहितेने तर भिलदरी तांडा येथे ४५ वर्षीय महिलेने टोकाचे पाऊल उचलले.

राणी ऊर्फ विमल ज्ञानेश्वर अकोलकर (वय ३०, रा. हतनूर) व साक्रीबाई राजू राठोड (वय ४५, रा. भिलदरी तांडा) अशी या महिलांची नावे आहेत. हतनूर येथे राणी यांनी सोमवारी (२५ ऑगस्ट) दुपारी अडीचच्या सुमारास घरातील छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी हतनूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉ. प्रदीप कांबळे यांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. कन्‍नड ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस अंमलदार कैलास करवंदे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत भिलदरी तांडा येथे शेतकरी राजू भुरा राठोड यांची पत्नी साक्रीबाई यांनी सोमवारी दुपारी गळफास घेतला. पोलीस पाटील इंदलसिंग राठोड यांनी नागद पोलिस चौकीला कळवले. त्यानंतर पोलीस अंमलदार प्रदीप पवार, सुशीलकुमार बागुल यांनी घटनास्थळी पंचनामा केला. साक्रीबाई यांना फासावरून काढून नागद प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. साक्रीबाई यांच्या पश्चात पती, तीन मुले असा परिवार आहे.
छ. संभाजीनगरच्या मुस्लिम बांधवांचा आदर्श : गणेशोत्‍सवामुळे दोन दिवस उशिराने काढणार ‘जुलूस-ए-मोहमदी’‌!; पोलीस आयुक्‍तांच्या विनंतीला मान!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तीन वर्षांपासून गणेशोत्सव आणि ईद मागे-पुढे येत असून, यंदाही असाच पेच निर्माण झाला असता गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही ईद-ए-मिलादुन्नबी संयोजन समितीने दोन दिवस उशिराने मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी

Latest News

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एच सेक्टरमधील मौर्या ऑटो या कंपनीतील दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय...
खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
संघ लोकसेवा आयोगामार्फत १४ सप्टेंबरला राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा–II,  छ. संभाजीनगरात १६ परीक्षा केंद्र, ४७०२ उमेदवार
गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना केले रक्‍तबंबाळ!!
हरवलेली चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आईच्या कुशीत!, बजाजनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software