- Marathi News
- जिल्हा न्यूज
- गंगापूरजवळ भीषण अपघातात ३ ठार : राँग साइड येऊन भरधाव जीपने दुचाकीला उडवले, पती-पत्नीसह चिमुकल्याचा
गंगापूरजवळ भीषण अपघातात ३ ठार : राँग साइड येऊन भरधाव जीपने दुचाकीला उडवले, पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव जीपने राँड साइड येऊन मोटारसायकलीला उडवले. यात मोटारसायकलीवरील पती-पत्नीसह त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात गंगापूर-वैजापूर मार्गावर वरखेड पाटीजवळ आज, ८ सप्टेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.


वरखेड पाटी येथील ‘नांमका’च्या मुख्य कालव्याजवळ बारामतीहून वैजापूरकडे जाणाऱ्या भरधाव जीपने (क्र. एमएच १९ बीयू ४२१४) त्यांना उडवले. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी जखमींना गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर जीप घटनास्थळी सोडून चालक फरारी झाला. माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार विनोद बिघोत, हनुमंत सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनेची नोंद शिल्लेगाव पोलिसांनी घेतली आहे. कृष्णांशचा १३ सप्टेंबरला पहिला वाढदिवस होता. त्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. सजन यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तिघांच्या पार्थिवावर सायंकाळी सटाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.