पाणी काढताना विहिरीत पडून विवाहितेचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

On

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पाय घसरून विहिरीत पडल्याने अलका कारभारी फुले (वय ३५, रा. रजाळवाडी, ता. सिल्लोड) या विवाहितेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रजाळवाडी शिवारात रविवारी (७ सप्‍टेंबर) सकाळी ११ ला घडली.

अलका पाणी आणण्यासाठी गावाजवळील विहिरीवर गेल्या होत्‍या. पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्या. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी धावून त्‍यांना बाहेर काढत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अलका यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. सिल्लोड शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पी. टी. शिंदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छ. संभाजीनगरात मंत्र्यांचा प्रोटोकॉल, नागरिकांचे हाल!; बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला वकिलासोबत गैरवर्तन!!

Latest News

छ. संभाजीनगरात मंत्र्यांचा प्रोटोकॉल, नागरिकांचे हाल!; बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला वकिलासोबत गैरवर्तन!! छ. संभाजीनगरात मंत्र्यांचा प्रोटोकॉल, नागरिकांचे हाल!; बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला वकिलासोबत गैरवर्तन!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शिंदे गटाची मराठवाडास्तरीय पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा या कार्यक्रमांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
छ. संभाजीनगरात शिंदे गटाचा मेळावा : मनपा निवडणूक महायुती करूनच लढणार : पक्षात जे येतील त्यांना घेऊ, त्‍याने पक्ष मोठा होतो : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मेळाव्यानंतर रेटारेटीत काच फुटली!
प्रसिद्ध औषध कंपनीत नोकरी करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची आत्‍महत्‍या!, तो ब्‍लॅकमेलर कोण?, सिडकोतील घटनेने खळबळ
Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?
Special interview : अभिनेत्री वाणी कपूरने दिला कानमंत्र; धीर ही अशी किल्ली, जी प्रत्येकाच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software