‘मजिप्रा’, ‘जीव्हीपीआर’च्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; देवळाईत खड्ड्यात बुडून चिमुकल्याचा मृत्‍यू झाल्याचे प्रकरण

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहर पाणी योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी कंत्राटदाराने देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनीत खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात पडून ३ सप्‍टेंबरला ईश्वर संदीप भास्कर (वय साडेतीन वर्षे) या चिमुकल्याचा मृत्‍यू झाला होता. त्‍याच्या मृत्‍यूला जबाबदार धरून चिकलठाणा पोलिसांनी शनिवारी (६ सप्‍टेंबर) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्यात अधिकाऱ्यांची स्पष्ट नावे किंवा हुद्दा नसल्याचे समोर आले. नेमकी कुणाची जबाबदार होती, याचा तपास केला जात असल्याचे स्‍पष्टीकरण चिकलठाणा पोलिसांनी दिले. चिमुकल्याचे ईश्वरचे वडील संदीप भास्कर (वय ३०) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. तक्रारीनुसार, संदीप हे पत्नी व तीन मुलांसह भाड्याच्या घरात राहतात. फर्निचर बनविण्याचा व्यवसाय करतात. ज्या भागात राहतात तिथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंपनीने पाइपलाइन टाकण्यासाठी ६ महिन्यांपूर्वी खड्डे खोदलेले आहेत. खड्ड्याभोवती सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचले. या खड्ड्यात इशू ऊर्फ ईश्वर पडून बुडाला व त्याचा मृत्‍यू झाला. पोलिसांनी १०५, ३ (५) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (५ सप्‍टेंबर) पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिका आयुक्‍त जी. श्रीकांत यांना सोबत घेऊन घटनास्‍थळी पाहणी केली होती. यावेळी त्‍यांनी कंत्राटदाराची खरडपट्टी काढत २४ तासांत खड्डे बुजवण्याचे आणि दोषींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वीही अनेक दुर्घटनांप्रकरणी कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत, त्‍यावर केलेली कारवाई गुलदस्त्‍यात आहे. त्‍यामुळे या प्रकरणात तरी दोषी समोर येतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छ. संभाजीनगरात मंत्र्यांचा प्रोटोकॉल, नागरिकांचे हाल!; बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला वकिलासोबत गैरवर्तन!!

Latest News

छ. संभाजीनगरात मंत्र्यांचा प्रोटोकॉल, नागरिकांचे हाल!; बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला वकिलासोबत गैरवर्तन!! छ. संभाजीनगरात मंत्र्यांचा प्रोटोकॉल, नागरिकांचे हाल!; बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला वकिलासोबत गैरवर्तन!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शिंदे गटाची मराठवाडास्तरीय पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा या कार्यक्रमांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
छ. संभाजीनगरात शिंदे गटाचा मेळावा : मनपा निवडणूक महायुती करूनच लढणार : पक्षात जे येतील त्यांना घेऊ, त्‍याने पक्ष मोठा होतो : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मेळाव्यानंतर रेटारेटीत काच फुटली!
प्रसिद्ध औषध कंपनीत नोकरी करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची आत्‍महत्‍या!, तो ब्‍लॅकमेलर कोण?, सिडकोतील घटनेने खळबळ
Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?
Special interview : अभिनेत्री वाणी कपूरने दिला कानमंत्र; धीर ही अशी किल्ली, जी प्रत्येकाच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software