ट्रकच्या धडकेने चिकलठाण्याजवळ पादचारी मजुराचा मृत्‍यू

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भरधाव ट्रकने पादचारी मजुराला धडक दिली. यात मजुराचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना बुधवारी (३ सप्‍टेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील वरूड फाटा येथील कार्तिक हॉटेलसमोर घडली. चिकलठाणा पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध रविवारी (७ सप्‍टेंबर) गुन्हा दाखल केला असून, त्‍याचा शोध सुरू केला आहे.

भिमा आत्माराम मुगदल (रा. शेंद्रा कमंगर, छत्रपती संभाजीनगर) असे मृत्‍यू झालेल्या मजुराचे नाव आहे. त्‍यांची पत्‍नी मनिषा (वय ३१) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या सासू-सासरे व दोन मुले युवराज, ओम यांच्यासह राहतात. त्यांचे पती मिस्त्री काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी (३ सप्‍टेंबर) सकाळी साडेदहाला शेंद्रा कमंगर येथील पोलीस पाटील यांनी मनिषा यांना भिमा यांचा अपघात झाल्याचे सांगितले.

वरुडफाटा येथे जालना ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याने पायी येत असताना मागुन त्यांना ट्रकने (एमएच ४६, बीएम ४१५४) धडक दिली. यात भिमा गंभीर जखमी झाले. भिमा यांना चिकलठाणा येथील मिनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. अंत्यविधी केल्यानंतर मनिषा यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून ट्रकचालकाविरुद्ध तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रक्तबंबाळ नेपाळ...भारतही बारूदाच्या ढिगाऱ्यावर, Gen Z अन्‌ सोशल मीडियाची किती भयंकर आहे सध्याची कहानी...

Latest News

रक्तबंबाळ नेपाळ...भारतही बारूदाच्या ढिगाऱ्यावर, Gen Z अन्‌ सोशल मीडियाची किती भयंकर आहे सध्याची कहानी... रक्तबंबाळ नेपाळ...भारतही बारूदाच्या ढिगाऱ्यावर, Gen Z अन्‌ सोशल मीडियाची किती भयंकर आहे सध्याची कहानी...
दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाकेपी शर्मा ओली सरकारने नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातली. या निर्णयावर टीका केली जाऊ शकते....
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवनाला आग लावली, अनेक नेते देश सोडून पळून गेले...
शेताच्या तार कुंपनात वीज प्रवाह सोडला, धक्का लागून १४ वर्षीय मुलाचा मृत्‍यू, चौका येथील घटना
औषधी आणायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्‍याने खळबळ, बिडकीनजवळील घटना
११ वीत शिकणाऱ्या मुलीचा पाठलाग, मैत्री मग प्रेमाचा हट्ट... फोटो व्हायरल करण्याची धमकी, २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, वाळूज MIDC तील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software