विद्यार्थिनीवरील प्रेमप्रकरण उघड होण्याच्या भीतीने करिअर अकॅडमीच्या संचालकाने घडवले अपहरणकांड!; सिल्लोडची धक्कादायक घटना

On

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिल्लोडमधील हिंदवी करिअर अकॅडमीच्या संचालकाने आपल्या प्रेमप्रकरणाचे बिंग फुटू नये म्हणून अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे शनिवारी (७ सप्टेंबर) दुपारी अडीचला केळगाव घाटातून (ता. सिल्लोड) अपहरण केले. पोलिसांनी भराडीजवळ (ता. सिल्लोड) फिल्मीस्टाईल सापळा रचून दुपारी चार वाजता विद्यार्थ्याची सुटका करत सर्व अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्‍या. रविवारी (७ सप्‍टेंबर) त्‍यांना सिल्लोड न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणात अमोल गजानन मख (वय २०, रा. केळगाव) याच्या तक्रारीवरून दशरथ विठ्ठल जाधव (संचालक, हिंदवी करिअर अकॅडमी, सिल्लोड), गणेश कृष्णा जगताप (दशरथचा मित्र, रा. वडोदचाथा), गणेश सोनूसिंग चव्हाण (प्रशिक्षणार्थी विद्यार्थी रा. कोहाळातांडा) व प्रवीण लालचंद राठोड (प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, रा. कोहाळातांडा) या चौघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हिंदवी करिअर अकॅडमीत अमोल एक वर्षापासून पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. यादरम्यान संचालक दशरथ जाधवसोबत त्याची चांगली ओळख झाली.

जाधवचे अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम झाले. तिला प्रेमजाळ्यात ओढण्यासाठी जाधवने अमोलची मदत घेतली. त्याला दोघांची ओळख करून देण्यास भाग पाडले. यातून अमोल आणि जाधवमध्ये एक महिन्यापूर्वी बिनसले. जाधवने अमोलला अकॅडमीमधून काढून टाकले. दोघांच्या प्रेमप्रकरणाचे काही व्हॉईस रेकॉर्डिंग व पुरावे अमोलकडे असल्याने जाधव बिथरला होता. त्याला भीती होती, की अमोलने हे पुरावे व्हायरल केले तर आपले बिंग फुटेल. त्यामुळे जाधवने अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन मुलांना दुचाकीने केळगावला पाठवले. त्यांनी अमोलला भेटण्यासाठी गोड बोलून केळगाव घाटात बोलावले.

तेथे आधीच दबा धरून बसलेल्या जाधव व त्याचा एक मित्र यांनी अमोलला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. प्रेमप्रकरणाचे पुरावे मागितले. त्याने ते देण्यास नकार दिल्याने कारमध्ये (क्र. एमएच ४८ ए ९९१८) जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले. अमोलला मारहाण करत कारमध्ये डांबून सिल्लोडकडे नेताना अमोलच्या एका ओळखीच्या व्यक्तीने बघितल्याने त्याने तातडीने सिल्लोड ग्रामीण पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे, पोलीस अंमलदार यतीन कुलकर्णी, अनंत जोशी, रमेश व्यवहारे, विश्वनाथ तायडे, रामेश्वर जाधव, विठ्ठल नागलोद यांनी तातडीने भराडीजवळ फिल्मीस्टाईल सापळा रचून कार अडवत अमोलची सुटका केली आणि सर्व अपहरणकर्त्यांना पकडले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?

Latest News

Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल? Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?
लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. २२ सप्टेंबरपासून माँ दुर्गा तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. माँ दुर्गेच्या या दिवसांमध्ये,...
Special interview : अभिनेत्री वाणी कपूरने दिला कानमंत्र; धीर ही अशी किल्ली, जी प्रत्येकाच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते!
ट्रकच्या धडकेने चिकलठाण्याजवळ पादचारी मजुराचा मृत्‍यू
मोठी बातमी : हर्सूल जेलमध्ये ५ कैद्यांचा राडा!; तुरुंगाधिकाऱ्यांना मारहाण, इतके आक्रमक झाले की कर्मचाऱ्यांनाही ऐकत नव्हते..., नक्की काय अन्‌ कशामुळे घडलं जाणून घ्या...
वेळेत पोलिसांची गाडी आल्याने कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांची लूट टळली!; तिघांना अटक, धूत हॉस्पिटलसमोरील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software