- Marathi News
- सिटी क्राईम
- मोठी बातमी : हर्सूल जेलमध्ये ५ कैद्यांचा राडा!; तुरुंगाधिकाऱ्यांना मारहाण, इतके आक्रमक झाले की कर्मच...
मोठी बातमी : हर्सूल जेलमध्ये ५ कैद्यांचा राडा!; तुरुंगाधिकाऱ्यांना मारहाण, इतके आक्रमक झाले की कर्मचाऱ्यांनाही ऐकत नव्हते..., नक्की काय अन् कशामुळे घडलं जाणून घ्या...
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी दीडला ५ बंदिवानांनी मोठा राडा केला. एका बंद्याकडे संशयास्पद वस्तू आढळली. त्याबद्दल तुरुंगाधिकारी आणि त्यांचे सहकारी चौकशी करत असताना अचानक पाचही बंदी आक्रमक झाले आणि त्यांनी हल्ला चढवला. तुरुंगाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे. धोक्याची शिटी वाजवण्यात आल्याने जेलमधील सर्व कर्मचारी-अधिकारी बॅरेक २ कडे धावले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
तुरुंगाधिकारी चौकशी करत असतानाच अचानकच बंदी रितेश पुसे याने हल्ला चढला. तुरुंगाधिकाऱ्यांची कॉलर ओढून अंगावर धावून आला. इतर चारही बंद्यांनी कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली. पाचही बंदी आरडाओरड करत होते. कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी धोक्याची शिट्टी वाजवून इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यानंतर पाचही बंदी अत्यंत आक्रमक होऊन तुरुंगाधिकारी शिंदे यांना मारहाण करू लागले. त्यामुळे सहकारी कर्मचाऱ्यांनी बंद्यांना आटोक्यात आणण्यासाठी सौम्यबळाचा वापर केला व परीस्थिती नियंत्रणात आणली. थोड्याच वेळात इतर सर्कलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हर्सूल पोलिसांनी पाचही कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सदाफुले करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
ट्रकच्या धडकेने चिकलठाण्याजवळ पादचारी मजुराचा मृत्यू
By City News Desk
Latest News
09 Sep 2025 08:34:27
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शिंदे गटाची मराठवाडास्तरीय पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा या कार्यक्रमांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...