- Marathi News
- सिटी क्राईम
- कटकट गेट भागात ड्रग्ज तस्कराच्या घरावर छापा! एमडी डग्जसह गावठी कट्टा, भुताचा मुखवटा, चामडी हंटर, कव...
कटकट गेट भागात ड्रग्ज तस्कराच्या घरावर छापा! एमडी डग्जसह गावठी कट्टा, भुताचा मुखवटा, चामडी हंटर, कवड्या, कवट्यांची माळ अन् बरंच काही धक्कादायक आढळलं!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ड्रग्ज तस्कराच्या घरावर अंमलीपदार्थ विरोधी पथकाने छापा मारल्यानंतर एमडी ड्रग्ज साठ्यासह अनेक चक्रावणाऱ्या गोष्टी मिळून आल्या. जिन्सी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख नियाज शेख नजीर ऊर्फ सिकंदर (वय ३५, रा. मुजीब कॉलनी, गल्ली नं. २, कटकट गेट) असे या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे.
-दोन पिशव्यांत १२ ग्रॅमपेक्षा अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज
-कपाटातील पिशवीत मॅगझिन नसलेला गावठी कट्टा
-२० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची संशयित पावडर
-काळी जादू करण्यासाठी जनावरांची दोन हाडे, एक कासवाचे वरचे आवरण असलेले हाड, एक काळ्या कापडी भुताचा मुखवटा, चामडी हंटर, बारीक कवड्या, १०९ कवट्यांची माळ, मध्यम कवटीच्या ५५ कवट्या असलेली माळ आणि ३३ मोठ्या कवट्यांची एक माळ
-लाल रंगाच्या कापडात चंदेरी रंगाच्या धातूची ८४ आणि सोनेरी रंगाची ७९ नाणी सापडली. धातूचे कासव, काळ्या रंगाचे दगडगोटे, कुंकू, हळद.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
ट्रकच्या धडकेने चिकलठाण्याजवळ पादचारी मजुराचा मृत्यू
By City News Desk
Latest News
09 Sep 2025 08:34:27
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शिंदे गटाची मराठवाडास्तरीय पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा या कार्यक्रमांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...