प्रसिद्ध औषध कंपनीत नोकरी करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची आत्‍महत्‍या!, तो ब्‍लॅकमेलर कोण?, सिडकोतील घटनेने खळबळ

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसीतील प्रसिद्ध औषध कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीने भाड्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी (७ सप्‍टेंबर) रात्री दहाला आविष्कार कॉलनीत समोर आली. तिला कुणीतरी ब्‍लॅकमेल करत असल्याचा संशय असून, सिडको पोलिसांनी त्‍यादृष्टीने तपास सुरू केला आहे.

निकिता रवींद्र पवार (वय २२, रा. वांजूळ पोही, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर, ह. मु. आविष्कार कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे आत्‍महत्‍या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. निकिता बी. फार्मसी शिकलेली होती. दीड महिन्यापूर्वीच वाळूज एमआयडीसीतील वोक्हार्ट कंपनीत तिला नोकरी लागली होती. आविष्कार कॉलनीत ती दोन मैत्रिणींसह राहत होती. रोज कंपनीत बसने ये-जा करत होती. तिने टोकाचे पाऊल उचलले तेव्हा तिच्या दोन्ही रूममेट गावी गेल्या होत्या.

रविवारी निकिता कंपनीत गेली नाही. रात्री दहाला शेजारच्या रूममधील मुली तिला जेवायला मेसवर जाण्यासाठी बोलवायला आल्या. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मुलींनी खिडकीतून डोकावले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. निकिता फासावर लटकलेली होती. मुलींनी घरमालकाला कळवताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने निकिताला फासावरून काढत तत्‍काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. सिडकोचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी धाव घेतली. पंचनामा करून सध्या आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. 

तो ब्‍लॅकमेलर कोण?
दरम्‍यान, पंचनाम्यात पोलिसांना ३ सुसाइड नोट मिळून आल्या आहेत. यातील दोनमध्ये खाडाखोड केलेली असून, तिने त्‍या फाडलेल्या होत्‍या. एका सुसाइडमध्ये मम्मी, भाऊ, आजी-आजोबा मला माफ करा. माझ्यामुळे तुम्‍हाला त्रास होईल, असे लिहिलेले आढळले. दादा आईची काळजी घे. वडीलही सोडून गेले, मीही जगण्यास कंटाळले आहे, असाही उल्लेख आहे. मला माफ करा, असे नमूद केले आहे. आत्‍महत्‍येच्या आदल्या दिवशी निकिताने कुटुंबीयांना कॉल करून तुमच्या मोबाइलवर एक फोन येईल, तो ब्‍लॅकलिस्टमध्ये टाका. त्‍याचा फोन घेऊ नका, असे सांगितले होते. तरीसुद्धा कुटुंबीयांच्या फोनवर अनोळखी २५ कॉल आल्याची माहिती तिच्या भावाने दिल्याचे आजच्या अंकात एका वृत्तपत्राने म्‍हटले आहे. सिडको पोलिसांनी निकिताचा मोबाइल जप्त केला आहे. निकिताने कुटुंबीयांना ज्‍या फोनबद्दल सावध केले, तो नंबर कुणाचा, निकिताला कोण ब्‍लॅकमेल करत होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रक्तबंबाळ नेपाळ...भारतही बारूदाच्या ढिगाऱ्यावर, Gen Z अन्‌ सोशल मीडियाची किती भयंकर आहे सध्याची कहानी...

Latest News

रक्तबंबाळ नेपाळ...भारतही बारूदाच्या ढिगाऱ्यावर, Gen Z अन्‌ सोशल मीडियाची किती भयंकर आहे सध्याची कहानी... रक्तबंबाळ नेपाळ...भारतही बारूदाच्या ढिगाऱ्यावर, Gen Z अन्‌ सोशल मीडियाची किती भयंकर आहे सध्याची कहानी...
दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाकेपी शर्मा ओली सरकारने नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातली. या निर्णयावर टीका केली जाऊ शकते....
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवनाला आग लावली, अनेक नेते देश सोडून पळून गेले...
शेताच्या तार कुंपनात वीज प्रवाह सोडला, धक्का लागून १४ वर्षीय मुलाचा मृत्‍यू, चौका येथील घटना
औषधी आणायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्‍याने खळबळ, बिडकीनजवळील घटना
११ वीत शिकणाऱ्या मुलीचा पाठलाग, मैत्री मग प्रेमाचा हट्ट... फोटो व्हायरल करण्याची धमकी, २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, वाळूज MIDC तील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software