- Marathi News
- सिटी क्राईम
- छ. संभाजीनगरात मंत्र्यांचा प्रोटोकॉल, नागरिकांचे हाल!; बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला वकिला...
छ. संभाजीनगरात मंत्र्यांचा प्रोटोकॉल, नागरिकांचे हाल!; बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला वकिलासोबत गैरवर्तन!!
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शिंदे गटाची मराठवाडास्तरीय पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा या कार्यक्रमांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (८ सप्टेंबर) शहरात आले होते. त्यांच्यासाठी लावलेल्या बंदोबस्तामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पोलिसांनी चौक, उड्डाणपूल बंद केले. त्यामुळे नागरिक वाहतूक कोंडीत अडकले. त्यांनी संताप व्यक्त केला. याचदरम्यान एका वकील महिलेसोबत बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचाही प्रकार घडला. शिंदे गटाचे १२ आमदार, ३ मंत्री, आठ जिल्हाप्रमुख व ५० पेक्षा अधिक तालुकाप्रमुख शहरात आले होते. त्यांच्यासाठी १ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ॲड. निकिता नारायणराव गोरे या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केंद्र सरकारच्या वकील आहेत. त्यांची कार हॉटेल रामाजवळ बंद पडली. त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने पोलिसांनी चौक बंद केले. व्हीआयपी मूव्हमेंटमध्ये वाहन भररस्त्यात कसे बंद पडले? आपण मद्य प्राशन केले का? आपली वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी ॲड. गोरे यांना सुनावले. त्यांनी कारवर काठ्या मारून अरेरावी केल्याचा आरोप ॲड. गोरे यांनी केला.
मंत्र्यांची बडदास्त ठेवताना चौक, उड्डाणपूल बंद केले. त्यामुळे दुपारपासून जालना रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. सिडको बसस्थानक ते सेव्हन हिल्स, मोंढा नाका, अमरप्रीत चौकात वाहनांची प्रचंड कोंडी झाली. रुग्णवाहिकाही अडकल्या. संत एकनाथ रंगमंदिरासमोर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरच वाहने उभी केली होती. त्यामुळे तिथेही वाहतूक कोंडी झाली. हॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर नेते, पदाधिकाऱ्यांची वाहने जालना रोडवरच उभी केलेली होती. त्यामुळे रात्री ९ पर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
औषधी आणायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, बिडकीनजवळील घटना
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांची, सिल्लोडमध्ये एकाची आत्महत्या
By City News Desk
ट्रकच्या धडकेने चिकलठाण्याजवळ पादचारी मजुराचा मृत्यू
By City News Desk
Latest News
09 Sep 2025 15:18:09
दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाकेपी शर्मा ओली सरकारने नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातली. या निर्णयावर टीका केली जाऊ शकते....