गणेश विसर्जन करताना तलावात पडल्याने भक्‍ताचा मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील पोखरी तलावात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या ४८ वर्षीय व्यक्‍तीचा बुडून मृत्‍यू झाला. तलावात पडलेल्या मुलाला त्यांनी वाचवले. पण नंतर त्यांचाच पाय घसरून तलावात पडले. नागरिकांनी धाव घेऊन त्‍यांना बाहेर काढून खासगी रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (६ सप्‍टेंबर) सायंकाळी घडली.

सुधीर काशिनाथ मेणे (वय ४८, रा. श्रीरामपूर, ह. मु. पोखरी) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. कॉलनीतील सार्वजनिक गणेश मंडळाला विसर्जनासाठी उशीर होता. त्‍या मिरवणुकीत मुलाला सहभागी होता यावे म्हणून त्यांनी घरातील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी ११ वर्षीय मुलाला सोबत घेत पोखरी तलाव गाठला. गणरायाला निरोप दिल्यानंतर अचानक त्यांचा मुलगा पाय घसवरून तलावात पडला. मेने यांनी तातडीने त्‍याला बाहेर काढले. पण त्यांचा पाय घसरला आणि ते तलावात पडले.

मुलाने आरडाओरड केल्याने नागरिक धावून आले. त्‍यांनी मेने यांना बाहेर काढत खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्‍यांचा मृत्‍यू झाला होता. रात्री उशिरा त्यांच्यावर पोखरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधीर यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, तीन बहिणी असा परिवार आहे. घटनेची नोंद आधी सिडको पोलिसांनी घेतली. मात्र घटनास्‍थळ फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला. अधिक तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कैलास राठोड करत आहेत.

गंगापूरच्या शिवना नदीत आढळला मृतदेह
गंगापूर तालुक्यातील सोलेगाव येथे शिवना नदीपात्रात रविवारी (७ सप्‍टेंबर) दुपारी तीनच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. आज, ८ सप्‍टेंबरच्या सकाळपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. गुरे चारणाऱ्यांना गावाजवळील गायरानाजवळ शिवना नदी पात्राच्या कडेला ४० ते ४५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी पोलीस पाटील शिवाजी उमाप यांना कळवले. उमाप यांनी गंगापूर पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. ओळख पटविण्याचे आवाहन गंगापूर पोलिसांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?

Latest News

Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल? Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?
लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. २२ सप्टेंबरपासून माँ दुर्गा तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. माँ दुर्गेच्या या दिवसांमध्ये,...
Special interview : अभिनेत्री वाणी कपूरने दिला कानमंत्र; धीर ही अशी किल्ली, जी प्रत्येकाच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते!
ट्रकच्या धडकेने चिकलठाण्याजवळ पादचारी मजुराचा मृत्‍यू
मोठी बातमी : हर्सूल जेलमध्ये ५ कैद्यांचा राडा!; तुरुंगाधिकाऱ्यांना मारहाण, इतके आक्रमक झाले की कर्मचाऱ्यांनाही ऐकत नव्हते..., नक्की काय अन्‌ कशामुळे घडलं जाणून घ्या...
वेळेत पोलिसांची गाडी आल्याने कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांची लूट टळली!; तिघांना अटक, धूत हॉस्पिटलसमोरील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software