छ. संभाजीनगरात शिंदे गटाचा मेळावा : मनपा निवडणूक महायुती करूनच लढणार : पक्षात जे येतील त्यांना घेऊ, त्‍याने पक्ष मोठा होतो : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मेळाव्यानंतर रेटारेटीत काच फुटली!

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महायुतीतूनच लढण्याचे संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत, पक्षात येतील त्‍यांना घेऊ, याने पक्ष मोठाच होतो, असे स्पष्ट केले. जो उमेदवार असेल तो महायुतीचा असेल हे सूत्र समोर ठेवून निवडणुका जिंकायच्या आहेत, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना सोमवारी (८ सप्‍टेंबर) केले.

एकनाथ शिंदे यांनी जालना रोडवरील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुखांची बैठक घेतली. याआधी पत्रकार परिषदही घेतली. बैठकीनंतर संत एकनाथ रंगमंदिरात शिवसैनिकांचा मेळावा घेतला.
बैठकीत पदाधिकाऱ्यांना या सूचना...
हॉटेल रामा इंटरनॅशनलमधील बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट, आ. अर्जुन खोतकर, आ. प्रदीप जैस्वाल, आ. विलास भुमरे, आ. संतोष बांगर, आ. संजना जाधव, हेमंत पाटील आदींची उपस्थिती होती. निवडणुकीपूर्वी एक ॲप पदाधिकाऱ्यांना देण्यात येईल. त्‍याद्वारे मतदारांची माहिती संकलीत करावी. पक्षात होणाऱ्या नव्या प्रवेशामुळे चिंता करू नका. उलट ही पक्ष मोठा होण्याची लक्षणे आहेत. आपल्याला निवडणुका जिंकायच्या असल्याने पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले पाहिजेत, असा सल्ला त्‍यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

544971199_1350687236416675_73597 (1)

मेळाव्यात रणशिंग फुंकले...
संत एकनाथ रंगमंदिरात शिवसैनिकांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. निवडणुकीत एकालाच तिकीट मिळेल तेव्हा बंडखोरी करू नका. योग्यवेळी त्‍यांचाही योग्य सन्मान करू, अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली. लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा विरोधकांनी काढला नाही. मात्र विधानसभेत अपयश आल्यावर ईव्हीएम आणि मतचोरीचे खोटे आरोप करण्यात आल्याचे शिंदे म्हणाले.

546154304_1350704793081586_47126 (1)

या वेळी माजी आमदार कैलास पाटील, माजी महापौर त्र्यंबक तुपे, माजी नगरसेवक मनिष दहिहंडे, सोपान मिसाळ यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. दरम्‍यान, मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शिंदे यांच्या ताफ्याला रस्ता मिळावा म्‍हणून पोलिसांनी रंगमंदिराचे सर्व दरवाजे कार्यक्रम संपल्यानंतर बंद केले. त्‍यामुळे शिवसैनिकांची दार उघडण्यासाठी आरडाओरड केली. या रेटारेटीत मंदिराच्या दरवाजाची काच फुटली. यानंतर पोलीस तिथून बाजूला झाले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रक्तबंबाळ नेपाळ...भारतही बारूदाच्या ढिगाऱ्यावर, Gen Z अन्‌ सोशल मीडियाची किती भयंकर आहे सध्याची कहानी...

Latest News

रक्तबंबाळ नेपाळ...भारतही बारूदाच्या ढिगाऱ्यावर, Gen Z अन्‌ सोशल मीडियाची किती भयंकर आहे सध्याची कहानी... रक्तबंबाळ नेपाळ...भारतही बारूदाच्या ढिगाऱ्यावर, Gen Z अन्‌ सोशल मीडियाची किती भयंकर आहे सध्याची कहानी...
दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाकेपी शर्मा ओली सरकारने नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातली. या निर्णयावर टीका केली जाऊ शकते....
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवनाला आग लावली, अनेक नेते देश सोडून पळून गेले...
शेताच्या तार कुंपनात वीज प्रवाह सोडला, धक्का लागून १४ वर्षीय मुलाचा मृत्‍यू, चौका येथील घटना
औषधी आणायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्‍याने खळबळ, बिडकीनजवळील घटना
११ वीत शिकणाऱ्या मुलीचा पाठलाग, मैत्री मग प्रेमाचा हट्ट... फोटो व्हायरल करण्याची धमकी, २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, वाळूज MIDC तील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software