उद्योगपतींचे हजारो कोटी माफ होतात मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही?; छत्रपती संभाजीनगरात बच्‍चू कडू कडाडले,

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज सरकार माफ करते. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी नसल्याचे कारण पुढे करते. हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. त्यांना आत्महत्या करण्यास सरकार भाग पाडत आहे, असा घणाघात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व शेतकरी नेते बच्चू कडू यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जळगाव फेरण आणि फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथे शुक्रवारी (३ ऑक्टोबर) शेतकरी कर्जमाफी हक्क यात्रा आली असता बच्‍चू कडू यांनी सभा घेतली. सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले. सोयाबीन, कापसासारख्या पिकांना मातीमोल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही तर यापुढे तीव्र आंदोलन उभारू. २८ ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नागपुरात मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...

Latest News

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक... घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅसवर वडे, भजे तळणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध बुढीलाईनमध्ये रविवारी (१५ मार्च) दुपारी १२ ला कारवाई...
आधी कोण?; अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदे गटात रंगली वर्चस्वाची लढाई, ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत... उद्या काय होणार?
खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...
ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software