आधी कोण?; अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदे गटात रंगली वर्चस्वाची लढाई, ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत... उद्या काय होणार?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड उद्या, १८ मार्चला होणार आहे. अध्यक्षपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचे युतीत ठरले आहे, मात्र आधी कोणत्या पक्षाला संधी द्यायची, यावरून भाजप-शिंदे गटात जुगलबंदी रंगली आहे. भाजपकडे २५ सदस्य आहेत, शिंदे गटानेही आपल्या २१ मध्ये ४ अपक्षांची भर घालून संख्याबळ २५ वर नेले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष माघार घ्यायला तयार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे खा. संदिपान भुमरे यांनी म्हटले आहे, तर मंत्री अतुल सावे यांनीही वरिष्ठांशी चर्चा करून ते जो आदेश देतील त्याचे पालन करू, असे सांगितले आहे. नक्की काय घडेल, हे उद्याच कळेल.

जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या एकमेव सदस्यानेही अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार गटाकडे ४ सदस्य आहेत. शरद पवार गटाकडे १, ठाकरे गटाकडे ९ सदस्य आहेत. अपक्षांमुळे शिंदे गटाचे बळ वाढले, काँग्रेसच्या एकमेव सदस्याच्या प्रवेशामुळे भाजप पुन्हा पुढे गेली. अशात ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीत फाटले तर आम्ही प्रयत्न करू. अन्यथा तटस्‍थ राहू, असे आ. अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. भाजप किंवा शिंदे गटाला पाठिंबा देऊन काही पदे मिळविण्याची तयारी सध्या तरी ठाकरे गटाची दिसते. जिल्हा परिषदेत सत्तेसाठी किमान ३२ सदस्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाकरे गटाला काही पदे देऊन भाजप किंवा शिंदे गट अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावरही दावे करू शकतो.

मागील काळातही (२०१७ ते २०२२) भाजपकडे सर्वाधिक सदस्य असताना शिवसेनेने (अविभाजीत) काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता ताब्यात घेतली होती. यातून पाचही वर्षे अध्यक्षपद स्वतःकडे ठेवले होते. आता शिंदे गट-ठाकरे गट एकत्र आले तर सत्ता ताब्यात घेऊ शकतात. पण असा निर्णय घेऊन भाजपला दुखावण्याची जोखीम शिंदे गट घेण्याची शक्यता कमीच आहे. भाजप मात्र असे करू शकतो. कारण अलीकडच्या काळात सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपने शत्रूलाही जवळ करण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे. पंचायत समितीत निवडणुकीत हे दिसून आले आहे.

सदस्य उद्या छत्रपती संभाजीनगरात येणार
भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटाचे सदस्य सध्या सहलीवर पाठविण्यात आले आहेत. त्यांना उद्या शहरात आणण्यात येईल. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची विशेष सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात दुपारी २ ला होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० ते १२ नामनिर्देशन स्वीकारले जाईल. दुपारी २ ला सभा सुरू होऊन प्रथम नामनिर्देश पत्रांची छाननी होईल. त्यानंतर नामनिर्देशन पत्र माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी (मराठी वर्णाक्षर क्रमानुसार) तयार करण्यात येईल. त्यानंतर प्रथम अध्यक्षपदासाठी व नंतर उपाध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर हात वर करून मतदान घेण्यात येईल. हात वर करून मतदान करणाऱ्या सदस्यांची स्वाक्षरी घेऊन नोंद घेण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...

Latest News

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक... घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅसवर वडे, भजे तळणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध बुढीलाईनमध्ये रविवारी (१५ मार्च) दुपारी १२ ला कारवाई...
आधी कोण?; अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदे गटात रंगली वर्चस्वाची लढाई, ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत... उद्या काय होणार?
खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...
ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software