घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅसवर वडे, भजे तळणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध बुढीलाईनमध्ये रविवारी (१५ मार्च) दुपारी १२ ला कारवाई करण्यात आली. सिटी चौक पोलीस ठाण्यात हॉटेलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडील ३ सिलिंडरही जप्त करण्यात आले.

पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर पांचाळ (रा. भाग्योदयनगर, सातारा परिसर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. रविवारी (१५ मार्च) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशाने गॅस परिस्थिती सुरळीत आहे की नाही, याची तपासणी करण्याचे काम त्यांच्याकडे होते. पांचाळ यांच्यासह अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे, पुरवठा निरीक्षक अनिल वाहुळ, लिपीक हिदायततुल्ला हे खासगी वाहनाने गस्त घालत होते. दुपारी १२ ला ते बु‌ढीलाईन येथील हॉटेल अदील टी हाऊस येथे आले असता त्यांना हॉटेलमध्ये ३ घरगुती गॅस सिलिंडर दिसून आले. पैकी दोन वापर झालेले तर एकाचा वापर होत असल्याचे दिसले. घरगुती सिलिंडरवर भजे व वडे तळताना दिसल्याने पथकाने पंचनामा करून गॅस सिलिंडर जप्त केले. हॉटेलमालक मोहम्मद अनस सत्यनारायण वाघमारे (वय ४१, रा. जुनाबाजार बु‌ढीलाईन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...

Latest News

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक... घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅसवर वडे, भजे तळणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध बुढीलाईनमध्ये रविवारी (१५ मार्च) दुपारी १२ ला कारवाई...
आधी कोण?; अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदे गटात रंगली वर्चस्वाची लढाई, ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत... उद्या काय होणार?
खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...
ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software