वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आरटीईच्या नियमांना धाब्यावर बसवणे वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. पालकांच्या तक्रारीनंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी पत्र काढून शाळेला नियमबाह्य फी वसूल करू नका, अशी कडक शब्दांत समज दिली आहे.

गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे यांनी पत्रात म्हटले आहे, की आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसुली केली जात असल्याच्या पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही बाब आरटीई नियमांचा भंग करणारी आहे. नियमबाह्य वसुली केल्यास शाळेची आरटीई प्रवेशाची मान्यता काढण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाईल, असेही पत्रात बजावले आहे.

इंग्रजी शाळांवर शिक्षण विभागाची मेहरनजर
गेल्या काही दिवसांत वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील इंग्रजी शाळा सर्रास विद्यार्थ्यांच्या पालकांची वेगवेगळी कारणे पुढे करून आर्थिक लूट करत आहेत. या शाळांवर शिक्षण विभागाची मेहरनजर असल्याचा आरोप होत आहे. आता पालकाने आरोप केलेला असूनही केवळ पत्र देऊन समज देण्यापलिकडे कोणतीही ठोस कारवाई करण्याची भूमिका घेतलेली नाही.

तक्रारदाराने काय म्हटलंय...
तक्रारदाराने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात शाळेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांना शाळेच्या व्हॉट्‌स ॲप ग्रुपमधून काढले जाते. मागील सत्राची गुणपत्रिका दिली जात नाही. उशीराने फी भरणाऱ्यांकडून दंड वसूल करणे आदी प्रकार घडतात. फिस दिली नाही म्हणून एका दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनीला अद्याप टीसी व मार्कमेमो न दिल्याने तिचे वर्ष वाया गेले आहे, ती विद्यार्थिनी न्यायालयात जाणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना तिच्या पालकांनी सांगितले. ही विद्यार्थिनी तिसरीपासून दहावीपर्यंत याच शाळेत शिक्षण घेत होती. शाळेच्या सखोल चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती नियुक्त गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्त केली होती. त्या समितीच्या अहवालात काय म्हटले आहे, हे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र आता लेखी पत्र देऊन केवळ समज देण्यापलिकडे ठोस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...

Latest News

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर... पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या तपासात अनेक धक्कादायक...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software