गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मित्राच्या सर्व खाचाखोचा माहिती ठेवल्यामुळे काय घडू शकतं, हे कन्‍नड घाटातील निर्घृण हत्‍येने समोर आणले आहे. मुंडके कापलेला मृतदेह सनसेट पाँईटजवळ मिळून आल्याने खळबळ उडाली होती. या खुनाचे गूढ अखेर आज, १२ सप्‍टेंबरला उकलले आहे. मित्रानेच मित्राचा काटा काढला. मी चोऱ्या करतो, गुंडगिरी करतो, दारू पितो, माझे सर्व लफडे तुला माहिती आहेत. तुझ्यामुळे माझी गावात बदनामी होत आहे. तू जर मेला तर माझे लग्न होईल, माझ्या सर्व अडचणी सुटतील, असे म्हणत मित्राला संपविण्याचा प्रयत्‍न त्‍याने केला खरा, पण मित्राने चाणाक्षपणे त्‍याचाच खात्‍मा केला... 

निखिल हिरामण सूर्यवंशी ऊर्फ लगड ऊर्फ पाटील ऊर्फ सुरसे (वय २८, रा. सिंदी ता. चाळीसगाव जि. जळगाव) असे हत्‍या झालेल्याचे नाव असून, पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव श्रावण ज्ञानेश्वर धनगर (रा. शिंदी ता. चाळीसगाव) असे आहे.

३ सप्‍टेंबरला आढळला होता मृतदेह
३ सप्‍टेंबरला कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौताळा अभयारण्यात सायगव्हाण शिवारातील सनसेट पाँईटजवळील घनदाट जंगलात २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा धडापासून मुंडके वेगळे केलेला मृतदेह आढळला होता. पोलिसांनी अज्ञात खुन्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे तपास पथक तयार करून समांतर तपास सुरू केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला मृतकाच्या अंगावर अंडरवेअर, हातात घडी व जबड्यात एक क्लिप बसवलेली आढळली होती. तपासात ही क्लिप एसएमबीटी हॉस्पिटल नांदीहिल्स धामणगाव घोटी ता. इगतपुरी जि. नाशिक येथे बसविण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्‍या हॉस्पिटलमध्ये जाऊन माहिती घेतली असता क्लिप निखिल सूर्यवंशीला बसविल्याचे सांगितले. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात निखिल हरवल्याची नोंदही झालेली होती. निखिलचा भाऊ व कुटुंबातील इतर सदस्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मृतकाची ओळख स्पष्ट झाली.

शिंदी गावात अहोरात्र मुक्‍काम ठोकून तपास...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या दोन टीम शिंदी गावात अहोरात्र मुक्काम करून तपास करत होत्‍या. शिंदी, वडरा, सायगव्हाण, चाळीसगाव भागात फिरून त्‍यांनी निखिलचे मित्र, नातेवाईक, शेजारी, गावातील नागरिक तसेच त्यांच्या संपर्कातील इतर लोक तो ज्या ज्या ठिकाणी काम करत होता, त्‍यांच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. निखिल रोजंदारीवर धुमस चालविण्याचे काम करत होता. तसेच तो बकऱ्या चोरण्याचे कामही करायचा. गावामध्ये गुंडगिरीदेखील करत होता. त्याचा मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर याला सर्व माहिती होती. ते बऱ्याच वेळा सोबत असायचे. 

श्रावणला ताब्‍यात घेताच पोपटासारखा बोलला...
श्रावण हा निखिलचा मित्र असल्याची माहिती पोलिसांना कळल्याने त्‍यांनी श्रावणवर नजर ठेवायला सुरुवात केली. संशय अधिक गडद होताच पोलीस निरीक्षक  विजयसिंह राजपूत व त्‍यांच्या पथकाने श्रावणला ताब्‍यात घेतले आणि कसून चौकशी सुरू केली. तेव्हा त्‍याने खुनाची कबुली दिली. त्‍याने पोलिसांना सांगितले, की निखीलने मला २६ ऑगस्टला भेटून त्याला त्याच्या मैत्रिणीला भेटायला छत्रपती संभाजीनगर येथे जायचे आहे, असे सांगून सोबत चलण्यास सांगितले. त्‍यामुळे निखिल सूर्यवंशी व श्रावण धनगर असे मोटारसायकलीने छत्रपती संभाजीनगरला निघाले. सायगावमार्गे सनसेट पाँईटजवळ श्रावणला आणल्यानंतर निखिलने गाडी थांबली. निखिल हा श्रावणला म्हणाला, की मी चोऱ्या करतो. गुंडगिरी करतो. दारू पितो. माझे  सर्व लफडे तुला माहिती आहेत. तुझ्यामुळे माझी गावात बदनामी होत आहे. तू जर मेला तर माझे लग्न होईल. माझ्या सर्व अडचणी सुटतील.

आज तुझा शेवटचा दिवस आहे, असे म्हणून सोबत आणलेली कुऱ्हाडीने त्‍याने श्रावणला मारण्याचा प्रयत्न केला. श्रावणाने जोरदार प्रतिकार करत त्याच्या गुप्तांगावर लाथ मारली. तेव्हा निखित खाली पडला. निखिल पडताच त्याच्या हातातील कुऱ्हाड श्रावणने हिसकावून घेत निखिलच्या मानेवर वार केले. त्याचे शिर धडापासून वेगळे केले, अशी कबुली श्रावणने दिली. गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून श्रावणला कन्‍नड ग्रामीण पोलिसांच्या ताब्‍यात देण्यात आले आहे. खुनाचा गुन्हा उलडण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व पवन इंगळे, पोलीस अंमलदार प्रमोद पाटील, वाल्मीक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, गोपाळ पाटील, प्रशांत नांदवे, महेश बिरुटे, समाधान दुबिले, दीपक सुरोसे, बलवीरसिंग बहुरे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक संजय तांदळे, नीलेश कुडे, महिला पोलीस अंमलदार कविता पवार यांनी केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा

Latest News

गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मित्राच्या सर्व खाचाखोचा माहिती ठेवल्यामुळे काय घडू शकतं, हे कन्‍नड घाटातील निर्घृण हत्‍येने...
Adhyatm : पितृ दोष किती पिढ्यांपर्यंत टिकतो, गरुड पुराणातील उपाय जाणून घ्या...
मोबाईलवरून स्वतःचे 3D मॉडेल तयार करा मोफत; कोणत्याही ॲपची आवश्यकता नाही, घिबलीनंतर आता हा ट्रेंड होतोय लोकप्रिय!
टॉप फ्लोरवर राहणाऱ्यांकडून घेता येणार नाही मेंटेनेंस चार्ज...; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
पंचायत समितीसमोर थरार : भाड्यावरून वाद होताच रिक्षाचालक रॉडने प्रवाशाला क्रूरपणे मारहाण करत सुटला!; प्रवाशाचा पाय फ्रॅक्‍चर, गंभीर जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software