श्री गणेशा आरोग्याचा; छ. संभाजीनगरमध्ये २४६ शिबिरे, २० हजार लोकांची आरोग्य तपासणी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सहकार्याने) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत ‘श्री गणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात २४६ शिबिरांत २० हजार लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

६९६४ पुरुष, ७७२२ महिला, ५३६४ बालकांची तपासणी करण्यात आली. पैकी ४२२ जणांचे ईसीजी व ७२१४ जणांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. तपासणीसाठी आलेल्या व्यक्तींची आयुष्मान भारत कार्डची नोंदणीही करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाशी संलग्न रुग्णालये, महात्मा जोतिब फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालये, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे यांच्या माध्यमातून या शिबिरांचे आयोजन केले गेले. जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला.

गणेश दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत रक्तदाब, रक्तातील साखर, इसीजी, रक्त तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी आदी तपासण्या केल्या. त्याचबरोबर मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, यांसारख्या दुर्धर आजारांवरील योग्य ते मार्गदर्शन व उपचार करून देण्याकरिता मुख्यमंत्री सहायता निधी व इतर शासकीय योजनांमार्फत कशाप्रकारे सहाय्य मिळेल याबाबतचे प्रबोधन शिबिरांमध्ये करण्यात आले. उपक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे यांनी सहकार्य केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software