धिंड पॅटर्न : टिप्याला टेपारतच हातकड्या घालून धिंड!; लंगडत लंगडत चालला... गारखेडा, भरतनगर, साईनगरमधून २ तास मिरवला...

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : हत्या, हत्येचा प्रयत्न, विनयभंगाचे तब्बल २३ गुन्हे दाखल, ३ वेळा एमपीडीएअंतर्गत कारागृहात स्थानबद्ध तरीही गुन्हेगारी कारवाया थांबत नसलेल्या कुख्यात गुन्हेगार टिप्या ऊर्फ जावेद मसूद शेख याची पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या घालून तब्‍बल २ तास पायी धिंड काढली. त्‍याआधी बराच पाहुणचार झालेला असल्याने टिप्या लंगडत चालत होता. गारखेडा, भरतनगर, साईनगरमधून गुरुवारी (११ सप्‍टेंबर) सायंकाळी ५ ते ७ त्याला मिरवण्यात आले. त्याची पोलिसी मिरवणूक जेव्हा त्‍याच्याच घरासमोर आली, तेव्हा टिप्या चेहरा पाहण्यालायक झाला होता.

शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी शहर पोलीस कमालीचे आक्रमक झाले असून, कुख्यात गुन्हेगार पकडल्यानंतर अजिबात हयगय केली जात नाही. यथेच्छ पाहुणचार करणे, धिंड काढून त्‍यांची दहशत कमी करणे या उपक्रमामुळे राज्‍यभरात शहर पोलीस दल गाजू लागले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, विनोद भालेराव, अंमलदार भीमराव राठोड, कल्याण निकम, अंकुश वाघ यांनी टिप्याची धिंड काढली.

टिप्या अल्पवयीन असल्यापासूनच गुन्हेगारी क्षेत्रात आहे. पूर्वी तो पोलिसांना गुन्ह्याविषयी माहिती देत असायचा. म्हणजेच खबऱ्या म्हणून काम करायचा. गुन्हे करता करता पोलिसांना इतर गुन्हेगारांची टिपही देत होता. टिप्याकडून पोलिसांना गुन्ह्यांची माहिती मिळत असे म्हणून त्याच्या गुन्ह्यांकडे पोलिसांनीही सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष केले. बघता बघता टिप्या अट्टल गुन्हेगार झाला. त्‍याला व त्याच्या टोळीला काही अवैध व्यावसायिकांनी पोसले आहे. अलीकडच्या काळात टिप्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.

गेल्या २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री शेख अझर शेख (वय ४०, रा. गारखेडा) यांना टिप्याने तलवारीचा धाक दाखवून लुटले होते. अझर यांची दुचाकी ताब्यात घेत अडीच लाख रुपये लुटून नेत वर १ लाख रुपयांची खंडणीदेखील मागितली होती. हा प्रकार करण्यापूर्वी तो पंधरा दिवस आधीच जामिनावर बाहेर आला होता. तरीही त्याने पुन्हा हा गुन्हा केला होता. पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्‍याचा शोध सुरू केला होता. पोलिसांच्या भीतीने तो २६ ऑगस्ट रोजी थेट न्यायालयात हजर झाला. त्यानंतर पुंडलिकनगरचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी ९ सप्टेंबरला त्याला हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. न्यायालयाने त्याला या गुन्ह्यात १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा

Latest News

गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मित्राच्या सर्व खाचाखोचा माहिती ठेवल्यामुळे काय घडू शकतं, हे कन्‍नड घाटातील निर्घृण हत्‍येने...
Adhyatm : पितृ दोष किती पिढ्यांपर्यंत टिकतो, गरुड पुराणातील उपाय जाणून घ्या...
मोबाईलवरून स्वतःचे 3D मॉडेल तयार करा मोफत; कोणत्याही ॲपची आवश्यकता नाही, घिबलीनंतर आता हा ट्रेंड होतोय लोकप्रिय!
टॉप फ्लोरवर राहणाऱ्यांकडून घेता येणार नाही मेंटेनेंस चार्ज...; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
पंचायत समितीसमोर थरार : भाड्यावरून वाद होताच रिक्षाचालक रॉडने प्रवाशाला क्रूरपणे मारहाण करत सुटला!; प्रवाशाचा पाय फ्रॅक्‍चर, गंभीर जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software