सैन्यात कॅप्टन असल्याचे सांगून मानसन्मान मिळवायची, लष्करी गणवेशात मिरवायची... छत्रपती संभाजीनगरमध्ये ४८ वर्षीय महिलेला अटक

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भारतीय सैन्य दलात कॅप्टन असल्याचे सांगून मानसन्मान मिळवायची, त्‍यासाठी लष्करी गणवेशात मिरवायची... अखेर रूचिका अजित जैन (वय ४८, रा. धरमपूर, ता. छत्रपती संभाजीनगर) हिचे बिंग फुटले. दौलताबाद पोलिसांनी गुरुवारी (११ सप्‍टेंबर) सकाळी ११ वाजता तिला अटक केली. तिच्याकडून सैन्याचे गणवेश, मेडल्स, पॅराफोर्स युनिफॉर्म, खोटे ओळखपत्र, पिस्तूल व एअरगन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

रूचिका जैन ही दौलताबादसह परिसरात भारतीय सैन्य दलात कॅप्टन असल्याचे सांगायची आणि लष्करी गणवेशात फिरत होती. पुणे येथील मिलिटरी इंटेलिजन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी दौलताबाद पोलिसांच्या सहाकार्याने तिला पकडले. तिच्या धरमपूर गावातील घरावर छापा मारला तेव्हा ती आर्मी युनिफॉर्ममध्येच होती. कसून चौकशी केल्यानंतर तिच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती.

सैन्य दलाशी तिचा प्रत्यक्ष संबंधही नव्हता. घरझडतीत पॅरा फोर्सचे चिन्ह, ३ स्टार असलेला आर्मी युनिफॉर्म, रूचिका जैन नावाची नेम प्लेट, स्पेशल फोर्सचा लाल पट्टा, कॅप, बेल्ट, शूज, ग्लोज, फेस मास्क, मोजे, डेबोनिअर द सिक्युरीटी पिपल नावाचे बनावट आयकार्ड, ५.५ मिमी हॉक टॉय एअर पिस्टल, ई.एस.ए ६५ स्पोर्टस एअर रायफल, ट्रॉफी आढळली. या प्रकरणी पोलीस अंमलदार महेश घुगे यांच्या तक्रारीवरून रूचिका जैन हिच्याविरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूचिका स्वतःला सैन्यात कॅप्टन असल्याचे सांगत असल्याने विविध संस्था, शाळा, कोचिंग क्लासेसनी तिचा सत्कारही ठेवला होता. विशेष म्‍हणजे, सैन्यदलात गुप्तचर अधिकारी असल्याचे सांगून सध्या गुप्त मोहिमेवर असल्याचे ती उघडपणे सांगत होती. तेव्हाच अनेकांना तिच्याबद्दल संशय बळावला होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा

Latest News

गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मित्राच्या सर्व खाचाखोचा माहिती ठेवल्यामुळे काय घडू शकतं, हे कन्‍नड घाटातील निर्घृण हत्‍येने...
Adhyatm : पितृ दोष किती पिढ्यांपर्यंत टिकतो, गरुड पुराणातील उपाय जाणून घ्या...
मोबाईलवरून स्वतःचे 3D मॉडेल तयार करा मोफत; कोणत्याही ॲपची आवश्यकता नाही, घिबलीनंतर आता हा ट्रेंड होतोय लोकप्रिय!
टॉप फ्लोरवर राहणाऱ्यांकडून घेता येणार नाही मेंटेनेंस चार्ज...; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
पंचायत समितीसमोर थरार : भाड्यावरून वाद होताच रिक्षाचालक रॉडने प्रवाशाला क्रूरपणे मारहाण करत सुटला!; प्रवाशाचा पाय फ्रॅक्‍चर, गंभीर जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software