कंत्राटदाराचा ‘सत्यनारायण’!; समृद्धी महामार्गावर माळीवाड्याजवळ केलेल्या हलगर्जीपणाबद्दल गुन्हा दाखल

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कंत्राटदाराला हलगर्जीपणा नडला आहे. कंत्राटदाराने समृद्धी महामार्गावर माळीवाडा गावाजवळील पुलावर पडलेल्या भेगा बुजविण्यासाठी इंजेक्टेबल नोजल्स बसविले. मात्र हे काम करताना फलक लावले नाहीत. त्यामुळे मंगळवारी (९ सप्‍टेंबर) मध्यरात्री अनेक वाहने पंक्चर झाली. मोठ्या दुर्घटनेचीही शक्‍यता नाकारता येत नव्हती. त्‍यामुळे कंत्राटदाराविरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात गुरुवारी (११ सप्‍टेंबर) रात्री साडेअकराला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावरील मुंबई मार्गिकेवर पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये साधारण १५ मीटर लांबीमध्ये सूक्ष्म तडे आढळले होते. ते भरण्याचे काम करताना ॲल्युमिनिअमचे नोजल्स फिक्स करावे लागतात. काम करते वेळेस बॅरिकेडिंग केले होते. मंगळवारी (९ सप्‍टेंबर) रात्री साडेअकराला काम पूर्ण झाले. त्यानंतर वेगाने येत असलेली काही वाहने पहिल्या लेनमध्ये डायव्हर्जन ओलांडून नोजल्सवरून गेल्यामुळे ३ गाड्यांचे टायर पंक्चर झाले.

ही घटना मध्यरात्रीनंतर १० सप्‍टेंबरच्या पहाटे १२ वाजून १० मिनिटांनी घडली. काम चालू असताना ट्रॅफिक ड्रायव्हर्जन करण्याकरिता मजबूत बॅरेकेटिंग व चांगल्या दर्जाचे रिफ्लेक्टर लावणे गरजेचे असतानादेखील या मार्गाचे कंत्राटदार सत्यनारायण यांनी तसे न करता निष्काळजीपणा केल्याचे समोर आले. पोलीस अंमलदार योगेश पंडितराव सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून सत्यनारायण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बापू डोमाळे करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा

Latest News

गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मित्राच्या सर्व खाचाखोचा माहिती ठेवल्यामुळे काय घडू शकतं, हे कन्‍नड घाटातील निर्घृण हत्‍येने...
Adhyatm : पितृ दोष किती पिढ्यांपर्यंत टिकतो, गरुड पुराणातील उपाय जाणून घ्या...
मोबाईलवरून स्वतःचे 3D मॉडेल तयार करा मोफत; कोणत्याही ॲपची आवश्यकता नाही, घिबलीनंतर आता हा ट्रेंड होतोय लोकप्रिय!
टॉप फ्लोरवर राहणाऱ्यांकडून घेता येणार नाही मेंटेनेंस चार्ज...; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
पंचायत समितीसमोर थरार : भाड्यावरून वाद होताच रिक्षाचालक रॉडने प्रवाशाला क्रूरपणे मारहाण करत सुटला!; प्रवाशाचा पाय फ्रॅक्‍चर, गंभीर जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software