दोन अवैध सावकार गुंडांच्या त्रासाला कंटाळून तरुण व्यावसायिकाची आत्‍महत्‍या!; छत्रपती संभाजीनगर हादरले!!

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दोन अवैध सावकारांचा छळ असह्य झाल्याने २५ वर्षीय तरुण व्यावसायिकाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना उत्तरानगरीत गुरुवारी (११ सप्‍टेंबर) सायंकाळी ५ वाजता समोर आली. प्रतीक चंद्रकांत देशमुख असे आत्‍महत्‍या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

प्रतीक यांच्या वडिलांचा गारमेंटचा मोठा व्यवसाय आहे. प्रतीकही वडिलांच्याच व्यवसायात उतरले होते. २ अवैध सावकार गुंड किरकोळ पैशांच्या व्यवहारावरून त्‍यांना छळत होते. ते प्रतीक यांना भेटून धमकावत होते. त्‍यांचे पैसे प्रतीक यांनी परत केले होते, तरीही ते पन्नासपट अधिक परताव्याची मागणी करून त्रास देत होते. त्‍यामुळे प्रतीक नैराश्यात गेले. तीन दिवसांपासून अधिक तणावग्रस्त झाले होते.

वडिलांनी त्यांना खोदून विचारल्यानंतर त्यांनी ही बाब सांगितली. त्यानंतर वडिलांनी या गुंडांना संपर्क करून वाद मिटवण्याचा प्रयत्‍न केला. मात्र तरीही गुरुवारी दुपारी दोघा गुंडांनी प्रतीक यांचे घर गाठून पार्किंगमध्ये प्रतीक यांना धमकावले. त्‍यामुळे प्रतीक यांनी घराच्या वरच्या मजल्यावर जात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. बराच वेळ होऊनही प्रतीक हे दरवाजा उघडत नसल्याने वडिलांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता ते गळफास घेतलेले दिसून आले. प्रतीक यांना दोन लहान बहिणी आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा

Latest News

गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा गौताळा घाटातील क्रूर खुनाची कहानी आली समोर : ‘लफडे’ उघड होण्याच्या भीतीने मित्राचा काटा काढायला गेला, स्वतःच त्‍याची शिकार झाला!, कन्‍नड तालुक्‍यातील थरारपटाचा धक्कादायक उलगडा
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मित्राच्या सर्व खाचाखोचा माहिती ठेवल्यामुळे काय घडू शकतं, हे कन्‍नड घाटातील निर्घृण हत्‍येने...
Adhyatm : पितृ दोष किती पिढ्यांपर्यंत टिकतो, गरुड पुराणातील उपाय जाणून घ्या...
मोबाईलवरून स्वतःचे 3D मॉडेल तयार करा मोफत; कोणत्याही ॲपची आवश्यकता नाही, घिबलीनंतर आता हा ट्रेंड होतोय लोकप्रिय!
टॉप फ्लोरवर राहणाऱ्यांकडून घेता येणार नाही मेंटेनेंस चार्ज...; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
पंचायत समितीसमोर थरार : भाड्यावरून वाद होताच रिक्षाचालक रॉडने प्रवाशाला क्रूरपणे मारहाण करत सुटला!; प्रवाशाचा पाय फ्रॅक्‍चर, गंभीर जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software