पहाटे अचानक घराबाहेर पडलेल्या महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह!; छावणीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सहकार्याने) : भावसिंगपुऱ्यात मुलगा, दोन मुली व सेवानिवृत्त पतीसोबत राहणाऱ्या रंजना विष्णू गवळी (वय ५५) पहाटे अचानक घराबाहेर पडल्या अन्‌ नंतर निसर्ग कॉलनीतील एका विहिरीत त्‍यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (११ सप्‍टेंबर) सकाळी ८ ला घडली.

कुटुंबीय झोपेत असताना रंजना एकट्याच घराबाहेर पडल्या होत्या. सकाळी त्या घरात दिसत नसल्याने मुलाने आईची शोधाशोध सुरू केली. लाल माती परिसरातील विहिरीत रंजना यांचा मृतदेह आढळला. अग्निशमन दलाचे अधिकारी विजय राठोड, वैभव बाकडे यांनी सहकाऱ्यांसह येऊन मृतदेह बाहेर काढला. त्‍यांनी आत्‍महत्‍या केली, की अपघात आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. छावणी पोलीस तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software