बाजार सावंगीच्या रोहित कृषी सेवा केंद्राचा मालक शेषराव काटकरने हद्दच केली!; युरिया जास्त दराने विकत होता, कृषी विभागाने दाखवला हिसका!!

On

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात युरियाचा तुटवडा का निर्माण झाला, याचे कारण समोर आले आहे. काही दुकानदार साठेबाजी करत आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांना युरिया जास्त दराने घ्यावी लागत आहे. बाजार सावंगी येथील रोहित कृषी सेवा केंद्राचा मालक शेषराव कारभारी काटकर अशा दुकानदारांत सामील असल्याचे समोर आले आहे.

कारभारी काटकर याने दुकानापासून अर्धा किलोमीटरवरील घरातच युरियाचा साठा करून ठेवला आणि दीडपट दराने विक्री करत होता. कृषी विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी (२५ ऑगस्ट) सायंकाळी त्‍याच्या घरावर छापा मारला तेव्हा युरियाच्या २०३ गोण्या घरात अनधिकृतपणे ठेवल्याचे दिसले. त्‍याचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्याची शिफारस करण्यात आल्याचे जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी हरिभाऊ कातोरे यांनी सांगितले. काटकरने त्याच्या ई पास मशीनवर युरिया खताचा साठा शून्य असल्याचे दाखवला होता. तो २६० रुपयांची युरियाची गोणी ३५० ते ४५० रुपये दराने विकत होता. जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी हरिभाऊ कातोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी

Latest News

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एच सेक्टरमधील मौर्या ऑटो या कंपनीतील दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय...
खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
संघ लोकसेवा आयोगामार्फत १४ सप्टेंबरला राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा–II,  छ. संभाजीनगरात १६ परीक्षा केंद्र, ४७०२ उमेदवार
गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना केले रक्‍तबंबाळ!!
हरवलेली चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आईच्या कुशीत!, बजाजनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software