सुसाट कारने दुचाकीला १०० फूट फरपरट नेले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, पैठण तालुक्यातील भीषण दुर्घटना 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने उडवले. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (९ डिसेंबर) सायंकाळी ४ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-बीड राष्ट्रीय महामार्गावरील रजापूर गावाजवळ घडली.

शाकेर मंजूर शेख (वय ३५) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून, शाहरुख दिलावर शेख (वय २७, दोघेही रा. ब्राह्मणगाव, ता. पैठण) हा जखमी झाला आहे. शाकेर व शाहरुख हे रजापूरला दुचाकीत (क्र. एमएच २० एझेड ३०६१) पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पेट्रोल भरून झाल्यानंतर मुख्य रास्ता ओलांडताना छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे निघालेल्या भरधाव कारने (क्र. एमएच २० सीएस २६३१) त्यांना उडवले. धडक इतकी जोरात होती, की दुचाकीला कारने शंभर फुटांपर्यंत फरफटत नेले. नागरिकांनी धाव घेऊन शाहरुखला तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची नोंद पाचोड पोलिसांनी घेतली आहे. शाकेर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, असा परिवार आहे. त्यांचा दफनविधी आज, १० डिसेंबरला होणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बीड बायपासवरील लॉजवर पकडल्या २ बांगलादेशी महिला

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software