घृष्णेश्वराचे तत्‍काळ दर्शन घडवणारे 'हे' ५ भामटे पोलिसांनी शोधले! शेख सिकंदर, समत खान, सरवर शेख, शांतीलाल ढिवरे, सय्यद इम्रान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, भाविकांची करायचे लूट

On

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या श्रावण महिन्यात वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर आणि भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सर्रास लूट सुरू आहे. दोन्ही ठिकाणी पार्किंग शुल्‍काच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा रक्‍कम घेणे सुरूच आहेच, त्‍याचबरोबरच घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची तत्‍काळ दर्शन घडवून आणण्याच्या नावाखाली आर्थिक लूट होत आहे. याबद्दलच्या बातम्‍या आल्यानंतर पोलिसांनी बारकाईने या लुटीकडे लक्ष केंद्रीत केले असून, प्रतिव्यक्ती १०० रुपये वसूल केल्याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात ५ भामट्यांविरुद्ध रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख सिकंदर शेख सांडू (रिक्षा क्र. एमएच २० ईएफ ०२२४), समत खान बाबू खान (रिक्षा क्र. एमएच २० ईएफ १७१६), सरवर शेख अन्तर शेख (रिक्षा क्र. एमएच २० ईएफ २५०९), शांतीलाल अशोक ढिवरे (रिक्षा क्र. एमएच २० ईके ५४७५), सय्यद इम्रान सय्यद बाबर (रिक्षा क्र. एमएच २० डीसी ४४४६) अशी गुन्हा दाखल झालेल्या भामट्यांची नावे असून, त्‍यांच्याविरुद्ध राकेशकुमार श्रीदेशराज गुप्ता (रा. पंजाब) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, गुप्ता हे श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते.

भामट्यांनी गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून तत्काळ दर्शन करून देतो, असे सांगून प्रतिव्यक्ती १०० रुपयांप्रमाणे पैसे घेतले. मात्र दर्शन करून न देता त्याच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेत फसवणूक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत. दरम्‍यान, तत्‍काळ दर्शनाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबद्दल संस्थानने हात वर केले आहेत. वाढत्‍या तक्रारींमुळे खुलताबाद पोलिसांचा बंदोबस्त मंदिर परिसरासह बाहेर पडणाऱ्या दोन्ही दरवाजांवर तैनात केला आहे.

रिक्षाचालक, फुलविक्रेते अन्‌ सुरक्षारक्षक सामील?
तत्‍काळ दर्शनाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये रिक्षाचालक, फुलविक्रेते आणि सुरक्षारक्षक सामील असल्याची चर्चा आहे. पैसे घेऊन भाविकांना अर्ध्या रांगेत सोडून भामटे पसार होतात. दरम्‍यान, पार्किंग शुल्‍काच्या नावाखाली होणाऱ्या अव्वाच्या सव्वा लुटीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. भद्रा मारोती संस्थान आणि घृष्णेश्वर संस्‍थान यांनी पार्किंग ठेकेदारांना भाविकांना लुटण्याची परवानगीच दिल्याचे दिसून येते. यामुळे भाविकांत नाराजी व्यक्‍त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कामावरून घरी परतणाऱ्या महिलेला अडवून म्‍हणाला, तुमचे पती चक्कर येऊन पडले, पुढे महिलेसोबत जे घडले ते धक्कादायक, गुलमंडीत काय घडलं...

Latest News

कामावरून घरी परतणाऱ्या महिलेला अडवून म्‍हणाला, तुमचे पती चक्कर येऊन पडले, पुढे महिलेसोबत जे घडले ते धक्कादायक, गुलमंडीत काय घडलं... कामावरून घरी परतणाऱ्या महिलेला अडवून म्‍हणाला, तुमचे पती चक्कर येऊन पडले, पुढे महिलेसोबत जे घडले ते धक्कादायक, गुलमंडीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कामावरून घरी परतणाऱ्या महिलेला तुमचे पती चक्कर येऊन पडल्याचे सांगून सोबत नेले. एका ठिकाणी बसवून...
नाव अनिल शिंदे, शिक्षण १२ वी, फुकटचे ५० लाख असे उडवले की वाचूनच थक्‍क व्हाल!, सिडको पोलिसांनी आवळल्‍या मुसक्या!!, 
दुचाकीला ट्रकने उडवले, आजीचा मृत्‍यू, नात-नातू गंभीर जखमी, रुग्णालयातून घरी परतत होते, सिल्लोड तालुक्‍यातील भीषण दुर्घटना
१२ हून अधिक गुन्हे, अट्टल गुन्हेगाराची धारदार शस्त्र हातात घेऊन आकाशवाणी चौकात दहशत!
नाल्यात ३ इमारती, त्‍यातली एक चक्क ४ मजली!; शेख काझीम यांची करामत महापालिकेने बुलडोझर लावून पाडली!!; दुसऱ्या दिवशी नारेगावमध्ये ८१ अतिक्रमणे उद्‌ध्वस्त
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software