- Marathi News
- सिटी डायरी
- नाल्यात ३ इमारती, त्यातली एक चक्क ४ मजली!; शेख काझीम यांची करामत महापालिकेने बुलडोझर लावून पाडली!!;...
नाल्यात ३ इमारती, त्यातली एक चक्क ४ मजली!; शेख काझीम यांची करामत महापालिकेने बुलडोझर लावून पाडली!!; दुसऱ्या दिवशी नारेगावमध्ये ८१ अतिक्रमणे उद्ध्वस्त
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (५ ऑगस्ट) अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महापालिकेने ८१ अतिक्रमणांवर बुलडोझर चालवला. सोमवारी (४ ऑगस्ट) १७५ मालमत्ता पाडल्या होत्या. आता नारेगावचा मुख्य रस्ता १०० फूट रूंद झाला आहे. जयभवानी चौकातून कचरा डेपोकडे जाताना सर्वाधिक डावीकडील मालमत्ता बाधित झाल्या असून, कोणाचे १०, तर कोणाचे ७ फुटांपर्यंत बांधकाम तोडण्यात आले आहे. निवासी मालमत्ता १५ ऑगस्टपर्यंत स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
.jpg)
वाळूज एमआयडीसीतील ११५० अतिक्रमणे उद्ध्वस्त
वाळूज महानगरात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाने पोलिसांच्या मदतीने ११५० अतिक्रमणे उद्ध्वस्त केली आहेत. १२०० अतिक्रमणांवर मार्किंग केली होती. सोमवारनंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारीही कारवाई सुरू होती. मंगळवारी सकाळी आठलाच एमआयडीसीचे १०० तर पोलिसांचे १२५ मनुष्यबळ तैनात केले होते. १२ तास पाडापाडी चालली. प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे उपस्थित होते. कारवाईची सुरुवात पंढरपूर ए सेक्टरपासून करण्यात आली. चार पथकांनी दिवसभर कारवाई करून रस्ते मोकळे केले.