चेन्‍नई एक्‍स्‍प्रेसमध्ये हातपाय बांधलेला मृतदेह आढळतो तेव्हा..., छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलिसांकडून ओळख पटवणे सुरू...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चेन्‍नई-नगरसोल साप्ताहिक एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये अनोळखी व्यक्तीचा हातपाय बांधलेला मृतदेह सोमवारी (४ ऑगस्ट) सकाळी १० ला दिसल्यानंतर खळबळ उडाली. छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर गाडी थांबता लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्‍यात घेतला. लोहमार्ग पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

जनरल कोचच्या कपलिंगवर एकजण तोंडावर टॉवेल टाकून झोपलेला असल्याचे प्रवाशांना दिसले. त्‍यामुळे कोणीही त्याच्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. गाडी सेलू स्टेशनवरून सुटल्यानंतर एका प्रवाशाला त्याचे हात-पाय बांधलेले असल्याचे दिसले. त्‍याने अन्य प्रवाशांना सांगितल्यानंतर डब्‍यात खळबळ उडाली. प्रवाशांनी ही माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. रेल्वे छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर येताच पोलिसांनी मृतदेह उतरवून घेत घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्रवाशाची ओळख पटविण्याचे काम सरू आहे. लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे प्रवासी सेना, पक्की खबर सेना ग्रुपच्या सदस्यांनी तामिळनाडू, कर्नाटक आंध्रप्रदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात असा कुणी प्रवाशी बेपत्ता आहे का, याचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश दळवी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप

Latest News

उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर...
शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली, चावणाऱ्या कुत्र्यांपैकी एकाला नागरिकांनीच केले ठार, मोतीकारंजा येथील घटना, मारणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्‍यू, वैजापूर तालुक्‍यातील पालखेडची दुर्दैवी घटना
बैलगाडी उलटून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्‍यू, कन्‍नड तालुक्‍यातील घटना
कामावरून घरी परतणाऱ्या महिलेला अडवून म्‍हणाला, तुमचे पती चक्कर येऊन पडले, पुढे महिलेसोबत जे घडले ते धक्कादायक, गुलमंडीत काय घडलं...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software