पाऊस आला की वीज लगेच गायब, पारगावकरनगरातील नागरिक त्रस्‍त, महावितरणविरुद्ध संताप

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पारगावकरनगरमध्ये पाऊस सुरू झाला, की वीज लगेच जात असल्याने महावितरणच्या कारभाराविरुद्ध नागरिक संताप व्यक्‍त करत आहेत. महावितरणने केलेल्या मान्सूनपूर्व कामांचा फोलपणाही यामुळे समोर येत आहे.

पिसादेवी रोडवर पारगावकरनगर ही स्वतंत्र वसाहत असून, नोकरदार, व्यावसायिक मंडळी मोठ्या प्रमाणावर राहतात. गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे सातत्‍याने या नगरात विजेचा लपंडाव सुरू आहे. थोडाही पाऊस आला की, वीज गायब होते. याशिवाय मध्येही अनेकदा वीज येजा करत असते. त्‍यामुळे अनेकांची विद्युत उपकरणे खराब झाली आहेत. १०० टक्‍के वीजवसुली असलेल्या या भागात महावितरण करत असलेल्या खेळामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पारगावकरनगरातील विजेचा खेळखंडोबा थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी

Latest News

तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी
मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी अशोक खेमका ३४ वर्षे नागरी सेवेत राहिले. या काळात त्यांच्या एकूण ५७...
‘देशहिताच्या विचाराला मारक असणाऱ्या शक्ती उदयास येतात, तेव्हा संत शक्ती मैदानात उतरते’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संत रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत २ मोठ्या घोषणा!
नारेगाव अतिक्रमण काढताना राडा करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
काही तासांची ‘नवरी’... ३९ वर्षीय युवकाला लग्‍नाच्या आमिषाने छ. संभाजीनगरला बोलावून सिनेस्‍टाइल लुटले!; कोर्टात केलेली लग्‍नाची नोटरी अन्‌ २५ वर्षीय 'दुल्हन' घेऊन टोळी पसार!!, शहरात विवाहेच्‍छुकांना लुटणारे रॅकेट?
उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software