- Marathi News
- सिटी क्राईम
- १२ हून अधिक गुन्हे, अट्टल गुन्हेगाराची धारदार शस्त्र हातात घेऊन आकाशवाणी चौकात दहशत!
१२ हून अधिक गुन्हे, अट्टल गुन्हेगाराची धारदार शस्त्र हातात घेऊन आकाशवाणी चौकात दहशत!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १२ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार अनिल ऊर्फ सोनू ज्ञानोबा दाभाडे (वय २४, रा. नागसेननगर बुद्धविहारामागे उस्मानपुरा) याला जवाहरनगर पोलिसांच्या डायल ११२ च्या अंमलदारांनी जिवावर उदार होत आकाशवाणी चौकात पकडले. तो हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवत होता. शनिवारी (२ ऑगस्ट) ही कारवाई करण्यात आली. अनिलने केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही गुन्हेगारी कारवाया केल्याचे समोर आले.


हा एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येत अनिलविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याचा गुन्हेगारी आलेख बघिता असता चोरी, घरफोडी, लुटमारी, शारीरिक इजा करण्याचे १२ हून अधिक गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल असल्याचे समोर आले. यात सातारा, शिल्लेगाव, उस्मानपुरा, बिडकीन, जवाहरनगर या पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. उस्मानपुऱ्यात त्याने सर्वाधिक कारनामे केले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासिक अंमलदार रमेश खलसे, पोलीस अंमलदार वामन नागरे, मारोती गोरे यांनी केली.