- Marathi News
- सिटी क्राईम
- धक्कादायक : तू खूप क्यूट आहेस, उद्या फिरायला जाऊ... म्हणत ९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत स्कूलबसचालकाचे
धक्कादायक : तू खूप क्यूट आहेस, उद्या फिरायला जाऊ... म्हणत ९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत स्कूलबसचालकाचे अश्लील कृत्य, छ. संभाजीनगरात संताप

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तू खूप क्युट आहेस, उद्या आपण दोघे फिरायला बाहेर जाऊ, तू घरी तुझ्या आई- वडिलांना सांग शाळेतून येण्यास उशीर होणार आहे, असे म्हणत चालकाने स्कूलबसमध्ये अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना ३१ जुलैला घडल्याचे आता समोर आले आहे. विशेष म्हणजे, ही घटना दडविण्याचा प्रयत्न झाला असून, शाळेला पोलिसांकडून पाठिशी घालण्याचा प्रयत्न यात झाल्याचे दिसून येत आहे.
चिमुकल्यांची सुरक्षा वाऱ्यावरच
शहरात वाहतूक पोलीस एकीकडे विद्यार्थी सुरक्षा मोहीम राबवत असताना दुसरीकडे हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने कारवाईतील फोलपणा समोर आला आहे. ३१ जुलैला ही घटना घडूनही पोलिसांनी ती दडवण्याचा प्रयत्न का केला, हे कळायला मार्ग नाही. शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस, व्हॅन, रिक्षांची तपासणी करून ४०० पेक्षा अधिक चालकांवर लाखोंचा दंड ठोठावला. पण कारवाई केवळ दंडाच्या वसुलीसाठी होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याकडून नियमांची अंमलबजावणी कोण करून घेणार, असा प्रश्न आहे. जिल्ह्यात रोज तब्बल २५ हजारांवर विद्यार्थी स्कूल बस आणि रिक्षांतून शाळेत येजा करतात. जिल्ह्यात १ हजार २४७ स्कूल बस आहेत. मोठ्या बस, मिनी बस आणि छोट्या चारचाकी स्कूल बसचा यात समावेश आहे.
काय आहेत नियम...
फिटनेस सर्टिफिकेट, टॅक्स, विमा अद्ययावत असावे, चालकाकडे लायसन्स असावे, महिला अटेंडंट असावी, चालक, वाहक किंवा अटेंडंट हा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला असावा, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतुकीस मनाई, खिडक्यांना ग्रिल किंवा सेफ्टी लॉक असावे, सीसीटीव्ही कॅमेरे अत्यावश्यक, बसमध्ये शाळेचा संपर्क क्रमांक व इमर्जन्सी नंबर लावलेले असावेत, दरवर्षी आरटीओकडून बसची तपासणी, प्रथमोपचारपेटी असणे बंधनकारक, वाहनाचा रंग पिवळा हवा असे नियम असूनही या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे वाहतूक पोलिसांच्या कारवाईत समोर आले होते. आताच्या घटनेमुळे पुन्हा या यावर प्रकाश पडला आहे.