दुचाकीला ट्रकने उडवले, आजीचा मृत्‍यू, नात-नातू गंभीर जखमी, रुग्णालयातून घरी परतत होते, सिल्लोड तालुक्‍यातील भीषण दुर्घटना

On

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : दुचाकीला ट्रकने मागून उडवले. यात दुचाकीवरील वृद्धेचा जागीच मृत्‍यू झाला, तर २२ वर्षीय तरुणासह त्याची १५ वर्षीय चुलत बहीण गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना जळगाव- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील डिग्रस (पानस) फाट्यावर (ता. सिल्लोड) मंगळवारी (५ ऑगस्ट) रात्री ८ ला घडली.

द्वारकाबाई रघुनाथ सोनवणे (वय ७५) असे अपघातात मृत्‍यू झालेल्या वृद्धेचे  नाव आहे. अजय त्र्यंबक सोनवणे (वय २२), संजीवनी विजय सोनवणे (१५, सर्व रा. डिग्रस, ता. सिल्लोड) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. अजय नुकताच ‘सीआरपीएफ'मध्ये भरती झाला असून, त्याची ट्रेनिंग सुरू आहे. १५ दिवसांची सुटी घेऊन तो डिग्रसला आला आहे. संजीवनी त्याची चुलत बहीण असून, ती आजारी असल्याने तिला व काकू द्वारकाबाई यांना घेऊन अजय दुचाकीने गोळेगाव येथील रुग्णालयात आला होता.

घरी परतत असताना डिग्रस फाट्यावर रस्ता ओलांडताना त्यांच्या दुचाकीला सिल्लोडकडून जळगावकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमपी ०६, एचजी ३११४) मागून जोरात धडक दिली. द्वारकाबाई ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्‍यूमुखी पडल्या. अजय व संजीवनी दूर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी दाखल केले. अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. संजीवनीच्या आई-वडिलांचे निधन झालेले असून, तिचा सांभाळ आजी द्वारकाबाई करत होत्या.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी

Latest News

तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी
मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी अशोक खेमका ३४ वर्षे नागरी सेवेत राहिले. या काळात त्यांच्या एकूण ५७...
‘देशहिताच्या विचाराला मारक असणाऱ्या शक्ती उदयास येतात, तेव्हा संत शक्ती मैदानात उतरते’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संत रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत २ मोठ्या घोषणा!
नारेगाव अतिक्रमण काढताना राडा करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
काही तासांची ‘नवरी’... ३९ वर्षीय युवकाला लग्‍नाच्या आमिषाने छ. संभाजीनगरला बोलावून सिनेस्‍टाइल लुटले!; कोर्टात केलेली लग्‍नाची नोटरी अन्‌ २५ वर्षीय 'दुल्हन' घेऊन टोळी पसार!!, शहरात विवाहेच्‍छुकांना लुटणारे रॅकेट?
उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software