नाव अनिल शिंदे, शिक्षण १२ वी, फुकटचे ५० लाख असे उडवले की वाचूनच थक्‍क व्हाल!, सिडको पोलिसांनी आवळल्‍या मुसक्या!!, 

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाव-अनिल गोविंदा शिंदे, राहणार - पाचोरा, जि. जळगाव, शिक्षण-१२ वी... कारनामा- दुबईत कंपन्या असल्याची बतावणी करून शेतकऱ्याला ५० लाखांना गंडा... ऐकून कुणीही हैराण होईल, पण खरंच असं घडलं आहे, अनिलनं या ५० लाखांचं काय केलं माहितेय..? १० लाखांची एकरकमी एफडी केली. डान्सबारमध्ये पैसे उडवले, २ सोन्याच्या अंगठ्या केल्या, दीड लाखाचा मोबाइल खरेदी केला... पोलिसांनी त्‍याला पकडले तेव्हा अवघे त्‍याच्याकडे १२ लाखच उरले होते...

अनिलविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात चंद्रभान बापूराव वटाणे (वय ७२, रा. बजाजनगर) यांनी तक्रार दिली होती. त्‍यांची काही वर्षांपूर्वी अनिलसोबत आळंदीत भेट आणि ओळख झाली. अनिलने स्वतःला दुबईचा उद्योजक असल्याचे सांगून माझ्या दुबईत कंपन्या असून तुम्‍ही गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट फंडिंग करतो, ५ लाख दिले तर १५ लाख रुपये देतो, अशी बतावणी केली. वटाणे यांचे मित्र गौतम पाईकराव (रा. हातेडी, ता. परतूर, जि. जालना) यांची समर्थ फार्मर नावाने पशुखाद्य निर्मितीची कंपनी आहे. त्यांना व्यवसाय वाढविण्यासाठी पैशांची गरज होती. वटाणे यांनी पाईकराव यांची अनिल शिंदेशी भेट घडवली. शिंदेच्या बोलण्यात गुंतून वटाणे व पाईकराव यांनी दीड कोटी रुपये मिळतील या आशेने शिंदेला ५० लाख रुपये दिले.

पैसे मिळताच १८ मार्च २०२५ रोजी सकाळी शिंदे छत्रपती संभाजीनगर शहरातून गायब झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल करून सिडको पोलिसांनी अनिलचा शोध सुरू केला. पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्‍त प्रशांत  स्वामी, सहायक पोलीस आयुक्‍त सुदर्शन पाटील आणि सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेवाळे, दीपक देशमुख, विशाल सोनवणे यांनी अनिलचा कसून शोध सुरू केला. तो मूळगावी पाचोऱ्यात आल्याचे कळताच पोलिसांनी तिथे जाऊन त्‍याच्या मुसक्या आवळल्‍या. सुरुवातीला त्‍याने ती मी नव्हेच असा पवित्रा घेतला. पण पोलिसांनी त्‍याच्या मोबाइलमधून त्‍याने डिलिट केलेला पैशांसोबतचा फोटो मिळवताच त्‍याने गुन्ह्याची कबुली दिली. त्‍याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने हर्सूल कारागृहात रवानगी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी

Latest News

तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी
मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी अशोक खेमका ३४ वर्षे नागरी सेवेत राहिले. या काळात त्यांच्या एकूण ५७...
‘देशहिताच्या विचाराला मारक असणाऱ्या शक्ती उदयास येतात, तेव्हा संत शक्ती मैदानात उतरते’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संत रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत २ मोठ्या घोषणा!
नारेगाव अतिक्रमण काढताना राडा करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
काही तासांची ‘नवरी’... ३९ वर्षीय युवकाला लग्‍नाच्या आमिषाने छ. संभाजीनगरला बोलावून सिनेस्‍टाइल लुटले!; कोर्टात केलेली लग्‍नाची नोटरी अन्‌ २५ वर्षीय 'दुल्हन' घेऊन टोळी पसार!!, शहरात विवाहेच्‍छुकांना लुटणारे रॅकेट?
उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software