करमाडमध्ये दिनेश लॉजवर सेक्स रॅकेट, पोलिसांचा छापा, ७ तरुणींची सुटका, लॉजचालकासह मॅनेजरला अटक

On

करमाड, ता. छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : करमाड पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने करमाड येथील हसनाबादवाडीतील हॉटेल दिनेश लॉजिंग-बोर्डिंगवर छापा मारून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या ठिकाणी पश्चिम बंगालमधील ६ आणि एका स्थानिक तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. पोलिसांनी सातही जणींची सुटका केली असून, हॉटेल चालक आणि मॅनेजरला अटक केली आहे.

लॉजचालक राजेश भाऊसाहेब मगरे (वय २६, रा. देवगाव तांडा, ता. बदनापूर जि. जालना) व मॅनेजर सागर गणेश साळुंके (वय २७, रा. अण्णाभाऊ साठेनगर, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. छाप्यात मोबाइल, निरोध पाकिटे असा एकूण ९५ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती, की करमाड पोलीस ठाण्याच्या करमाड हद्दीत छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवर असलेल्या हॉटेल दिनेश लॉजींग ॲण्ड बोर्डिंग येथे हॉटेल चालक व त्याचा मॅनेजर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा, त्यांच्या अशिक्षितपणाचे व असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन वेश्याव्यवसाय करवून घेत आहेत.

या माहितीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी पूजा नागरे, सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नरवडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव यांच्या पथकाने २१ जुलैला दिनेश लॉजच्या परिसरात सापळा रचला. बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले. तेथे हॉटेल मॅनेजर सागर साळुंके याच्याकडे बनावट ग्राहकाने शरीरसंबंधासाठी महिलेची मागणी केली. त्याने महिला पुरविण्यास होकार देऊन ५०० रुपये घेतले. नंतर बनावट ग्राहकाला हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर नेले. तेथे राजेश मगरे याला भेटण्यास सांगितले.

पहिल्या मजल्यावर जाताच राजेश भेटला असता त्‍याने रूम नं. १०५ मध्ये जाण्यास सांगितले. तेथे एक महिला पाठवतो सांगितले. बनावट ग्राहक रूममध्ये जाताच राजेशने एका तरुणीला आणून सोडले. तरुणी येताच बनावट ग्राहकाने रूमबाहेर गॅलरीत येऊन पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी लगेचच लॉजवर हल्लाबोल करत झाडाझडती घेतली. ६ तरुणी पश्चिम बंगाल तर १ स्थानिक निघाली. सागर आणि राजेशला अटक करण्यात आली. त्‍यांच्याविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नागरे, सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नरवडे, विनोद भालेराव, पोलीस अंमलदार दिलीप साळवे, कपिल बनकर, ईशाद पठाण, भाग्यश्री चव्हाण, मनिषा साळवी, संदीप थोरात, सुनिल गोरे, संतोष टिमकीकर यांनी पार पाडली. या कारवाईने अनैतिक कृत्‍यात लिप्त असलेली मंडळी हादरून गेली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक

Latest News

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या देशात डिजिटल अरेस्ट हे सायबर भामट्यांचे कुटील कारस्थान चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगरातही अनेकांना या...
सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण, तू तिला सोड, म्‍हणत लोखंडी पाइप डोक्‍यात घालून केले गंभीर जखमी!; ए.एस. क्‍लबजवळील घटना
पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या तरुणीसोबत चर्चमध्ये ओळख, नंतर प्रेमासाठी हट्ट, पाठलाग अन्‌ माझ्यासोबत राहा म्‍हणून मारहाण!, बजाजनगरातील घटना
उस्मानपुऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिसांवर चाकूहल्ला, १ पोलीस जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software