पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २ तरुणांचा टवाळखोरांचा प्राणघातक हल्ला, सिडको एन ११ मधील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांवर चौघांनी धारदार शस्‍त्राने प्राणघातक हल्ला चढवला. हल्ल्यात एक तरुण जखमी झाला. ही घटना रविवारी (१५ फेब्रुवारी) रात्री आठच्‍या सुमारास सिडको एन ११ मधील साई मैदानाजवळ घडली.

अर्जुन विठ्ठल कोलते (वय २१) या तरुणाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो फुलंब्री तालुक्यातील कोलते टाकळी येथील आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस भरतीची तयारी करतो. सध्या सिडको एन ११ च्या साई मैदानाच्या बाजूला किरायाने खोली करून राहतो. त्‍याचे आई- वडील शेती करतात. रविवारी (१५ फेब्रुवारी) रात्री आठच्‍या सुमारास तो आणि त्‍याचा मित्र दीपक रामदास मालोदे (वय २३) जेवण करून रूमवर जात होते.

साई मैदानाच्या गल्लीजवळ असताना गोविंद पांढरे, कमलेश चौधरी, राज शिंदे, अनिल पडुळे (सर्व रा. जाधववाडी) यांनी दोघांना अडवले. तुझा मावसभाऊ पवन कुठे आहे, असे विचारून चौघांनी अर्जुन व दीपकला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. त्‍यांच्या तावडीतून दोघे पळून जात असताना गोविंदने धारदार शस्‍त्राने अर्जुनच्‍या उजव्या हाताच्‍या दंडावर मारून गंभीर जखमी केले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अर्जुनने सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्‍यावरून पोलिसांनी चौघा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार देविदास राठोड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software