वाळूज MIDC त कंटेनरने घडवला थरार; मद्यधुंद चालकाचा ताबा सुटल्याने टपऱ्या, हॉटेलमध्ये घुसला...लोक सैरावैरा पळत सुटले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज महानगर भागात मुख्य रस्त्यावर पंढरपूर परिसरातील व्यावसायिक, नागरिकांना रविवारी काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय आला. रविवार  सकाळची कामाची वेळ असताना  मद्यधुंद चालकाचा भरधाव कंटेनरवरील ताबा सुटला व तो चक्क दुभाजक तोडून रस्त्यालगतच्या छोटी हॉटेल, टपऱ्यांमध्ये घुसला. वेगात कंटेनर येत असल्याचे पाहून लोक सैरावैरा पळत बाजूला झाल्याने मोठी जीवितहानी टळली. या अपघातात चहा-नाश्त्याच्या, पाणीपुरीच्या टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच ग्रामपंचायतीची पाइपलाइनदेखील फुटली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी  एक कंटेन (एमएच १४ एलएल ६७७८) हा पंढरपूरहून अहिल्यानगरच्या दिशेने जात होता.परंतु कंटेनर चालवणारा चालक हा दारू पिऊन वाहन चालवत होता. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कंटेनर रस्त्याच्या दुभाजक तोडून रस्त्याच्या कडेच्या असलेल्या चहा-नाश्त्याच्या टपऱ्यांवर व पाणीपुरीच्या गाड्यांना जाऊन धडकला. त्यानंतर ट्रक बाजूच्या दुकानाच्या पायऱ्यांवर जाऊन थांबला. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजामुळे नागरिक घाबरून बाहेर पडले. यावेळी काही नागरिक टपऱ्यांजवळ उभे होते, ते बाजूला पळाल्याने थोडक्यात बचावले.

WhatsAppImage2026-02-16at10.08.43AM

जखमी चालकाला ओढून बाहेर काढले
सदर घटनेत टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याची पाइपलाइन तुटल्याने परिसरातील पाणीपुरवठा काही काळ विस्कळीत झाला. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी ट्रकचालकास ओढून बाहेर काढले असता तो मद्यधुंद होता. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिक व व्यापाऱ्यांच्या मदतीने अपघाग्रस्त ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना

Latest News

सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाशिवरात्रीला सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील  नागेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर आ. अब्‍दुल सत्तार यांनी मंदिरात जाऊन...
हर्सूल सावंगीत साऊंड सिस्टिम व लायटिंग डेकोरेशनचे दुकान फोडले, ९ लाखांचे साहित्‍य लंपास
खडकेश्वरजवळील BSNL चौकात स्कोडा कारचालकाचा थरार, स्कुटीस्वार व्यावसायिक जखमी
दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडताच काळाने घातला घाला!; स्कुटीच्या धडकेने वृद्धाचा मृत्‍यू, हर्सूलची घटना
विदेशी  नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software