सावधान ! शहरात भीक मागणाऱ्या टोळीकडून दागिन्यांसाठी चक्क मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

मूर्तिजापूर परिसरातील धक्कादायक घटना; नागरिकांनी चोप देऊन महिलांना केले पोलिसांच्या हवाली

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरातील सिग्नलवर तसेच विविध भागांत भीक मागणाऱ्या टोळ्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पण ही मंडळी आता दागिन्यांसाठी लूटमार, अपहरणासारखे गंभीर गुन्हेही करायला लागले आहेत.  महिलांच्या टोळ्या एकटेदुकटे खेळणाऱ्या लहान मुलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटत असल्याचा  धक्कादायक प्रकार मूर्तिजापूर भागात उघडकीस आला आहे. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी जमावाने गळ्यातील दागिन्यांसाठी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बाब लक्षात येताच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सदर महिलांना पकडून चांगलाच चोप दिला. तसेच पोलिसांना पाचारण करून आरोपी महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी मूर्तिजापूर भागात काही महिला घरोघरी फिरून भीक मागत होत्या. भीक मागत असताना त्यांनी अरेरावी करत अनेक घरांत घुसण्याचाही प्रयत्न केला. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास एका घरात ८ वर्षाच्या मुलीने  त्यांना शाबूदाणा खिचडी दिली. त्यावेळी त्या महिलांची नजर मुलीच्या गळ्यातील चेनकडे गेली. ही चेन हिसकावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण तो जमला नाही. त्यावेळी त्यांनी चक्क त्या मुलीलाच ओढत सोबत नेण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या मुलीने महिलेच्या हाताला झटका देऊन रडतच घराकडे पळ काढला. ही बाब समजताच रहिवासी जमा झाले. नागरिकांनी पाठलाग करून त्या महिलांना पकडले.

मोबाइलमध्ये घटना कैद; पोलिसांत धाव
या घटनेची परिसरात एकच चर्चा सुरू झाली. दागिने चोरण्यासाठी मुले पळवणारी टोळी आल्याच्या चर्चेनंतर मोठा जमाव जमा झाला होता. स्थानिकांनी महिलांचे मोबालमध्ये चित्रीकरण करून मारहाणीचा प्रयत्न केला. घटनेची माहिती कळताच नगरसेवक मनोज गांगवे, स्थानिक पदाधिकारी दीपक खोतकर यांनी जमावाला शांत करून पोलिसांना बोलावले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी धाव घेत भिक्षेकरी महिलांना ठाण्यात नेले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती. ठाण्यात भिक्षेकरी महिलेने मुलीला नेत असल्याची कबुली दिल्याचे तसेच याअनुषंगाने पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना

Latest News

सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाशिवरात्रीला सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील  नागेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर आ. अब्‍दुल सत्तार यांनी मंदिरात जाऊन...
हर्सूल सावंगीत साऊंड सिस्टिम व लायटिंग डेकोरेशनचे दुकान फोडले, ९ लाखांचे साहित्‍य लंपास
खडकेश्वरजवळील BSNL चौकात स्कोडा कारचालकाचा थरार, स्कुटीस्वार व्यावसायिक जखमी
दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडताच काळाने घातला घाला!; स्कुटीच्या धडकेने वृद्धाचा मृत्‍यू, हर्सूलची घटना
विदेशी  नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software