जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरण : १५ गुरुजींवर निलंबनाचा बडगा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राज्य सरकार एकीकडे कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी जीवाचे रान करत असताना कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार कन्नड तालुक्‍यातील जैतापूर येथे समोर आला होता. परीक्षा नियंत्रण व पर्यवेक्षणाची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांनीच मुलांना कॉप्या करण्याचा वाममार्ग दाखवल्‍याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून समोर आला. शिक्षण विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत १५ पेक्षा जास्त शिक्षक, कर्मचाऱ्यांवर निलंबानचा बडगा उगारत कठोर कारवाई केली आहे.

जैतापूर येथील परीक्षा केंद्रावर १० फेब्रुवारी रोजी बारावी परीक्षेत इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपीचा प्रकार घडला होता. यात ३०० पेक्षा जास्त विद्यार्थीही सहभागी असल्याचे आढळून आले. होते. शिक्षण आयुक्तांच्या कडक आदेशानंतर संबंधित खासगी संस्थाचालकांनी आता कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.  तसेच त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर विभागीय आणि राज्य मंडळाकडे पाठवण्यात येईल,' अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना

Latest News

सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाशिवरात्रीला सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील  नागेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर आ. अब्‍दुल सत्तार यांनी मंदिरात जाऊन...
हर्सूल सावंगीत साऊंड सिस्टिम व लायटिंग डेकोरेशनचे दुकान फोडले, ९ लाखांचे साहित्‍य लंपास
खडकेश्वरजवळील BSNL चौकात स्कोडा कारचालकाचा थरार, स्कुटीस्वार व्यावसायिक जखमी
दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडताच काळाने घातला घाला!; स्कुटीच्या धडकेने वृद्धाचा मृत्‍यू, हर्सूलची घटना
विदेशी  नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software