घृष्णेश्वराला फक्‍त बेलपत्र अन्‌ धोत्रा फुलेच वाहता येणार, परिसरात अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर होणार कारवाई!; भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटिबद्ध; जिल्हाधिकारी स्वामी

On

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : श्रावण महिना आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. देशभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना चांगला अनुभव मिळावा, यासाठी घृष्णेश्वर मंदिर संस्थान आणि सर्व शासकीय विभागांनी समन्वयातून सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (२३ जुलै) दिले.

वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) चंद्रहार ढोकणे, तहसीलदार स्वरूप कंकाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, पर्यटन विभागाचे सहायक संचालक संचालक विजय जाधव यांच्यासह महावितरण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. भाविकांसाठी स्वच्छता, आरोग्य, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, सुलभ वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिले.

523847812_1078018147762547_20526 

मंदिरात नियंत्रण कक्ष
मंदिरात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला जाईल. येथे भाविकांना आपत्कालीन आरोग्य सुविधा तसेच इतर मदतीसाठी मार्गदर्शन मिळेल. दिव्यांग, लहान मुले, महिला आणि वृद्ध भाविकांना दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मंदिर प्रशासनाने स्वयंसेवकांच्या मदतीने सुलभ दर्शनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. मंदिराच्या परिसरात विकले जाणारे खाद्यपदार्थ स्वच्छ आणि आरोग्यदायी असल्याची खात्री अन्न व औषध प्रशासन विभाग आणि ग्रामपंचायत विभागाने करावी. अनधिकृत किंवा अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. याबाबत संबंधित विभागाने जबाबदारीने काम करावे. उपवासाच्या भगर, प्रसादाच्या खाद्यपदार्थातून भाविकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याबाबत कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

गाभाऱ्यात बेलपत्र, धोत्रा फुल वाहण्याची परवानगी
गाभाऱ्यात स्वच्छता ठेवण्यासाठी पिंडीवर बेलपत्र आणि पांढऱ्या रंगाची धोत्रा फुले वाहण्याची परवानगी असेल. इतर कोणत्याही वृक्षाचे पान किंवा फुले अर्पण न करण्याचे आवाहन घृष्णेश्वर मंदिर विश्वस्तांनी केले आहे, जेणेकरून गाभाऱ्यातील स्वच्छता राखता येईल. मंदिर प्रशासनाला भाविकांना योग्य मार्गदर्शन करून दर्शनासाठी सहकार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले. घृष्णेश्वर विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर नियोजन करून कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक!

Latest News

रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक! रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्‍त्‍याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्‍डा...
कारमधून उतरल्यानंतर डॉक्‍टर कारमागे गेले, त्‍याचवेळी चालकाने जोरात रिव्हर्स घेतली, डॉक्‍टरांचा धडक बसून मृत्‍यू, वाळूज MIDC तील दुर्दैवी घटना
अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वाराच्या अंगावर बाजूच्या हॉटेलमधील गरम भाजीचे पातेले सांडले!, भाजून मृत्‍यू, कटकटगेटजवळील दुर्घटना
प्रियकराच्या ब्‍लॅकमेलिंगला कंटाळून १८ वर्षीय तरुणीची आत्‍महत्‍या, १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, भावसिंगपुऱ्यातील धक्कादायक घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ : ब्‍लॅकमेलर प्रेयसीची प्रियकराने केली निर्घृण हत्‍या!; पैशांसाठी बलात्‍काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची देत होती धमकी, त्‍याने डोके दगडावर आपटून दौलताबाद घाटात फेकला मृतदेह

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software