- Marathi News
- जिल्हा न्यूज
- श्रावणात खुलताबाद, वेरूळमार्गे वाहन नेणार असाल तर आधी ही बातमी वाचा...
श्रावणात खुलताबाद, वेरूळमार्गे वाहन नेणार असाल तर आधी ही बातमी वाचा...
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : श्रावणात प्रत्येक शनिवारी खुलताबाद येथील भद्रा मारोती आणि सोमवारी वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. त्यामुळे वेरूळच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गांवर २४ जुलै ते २३ ऑगस्टदरम्यान सर्व प्रकारची जड वाहतूक बंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ६ ते शनिवारी मध्यरात्री १ पर्यंत दौलताबाद टी पॉइंट ते खुलताबादच्या दिशेने जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे. शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन मिरधे यांनी ही माहिती दिली.
-छत्रपती संभाजीनगरकडून नाशिक, धुळ्याकडे जाणारी जड, मध्यम वाहने बाबा चौक, नगरनाका, एस. एस. क्लब, करोडीमार्गे सोलापूर-धुळे महामार्गावरून जांभाळा, कसाबखेडा फाटा, वेरुळमार्गे येतील व जातील.
-नाशिक, धुळ्यावरून शहरात येणारी मध्यम व जड वाहने कसाबखेडा फाटा, करोडी, ए.एस. क्लबमार्गे सरळ शहरात येतील.
-कन्नडकडून येणारी वाहने कसाबखेडा फाटा, वरझडी, माळीवाडा, शरणापूर फाट्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे येतील.
-धुळ्याकडून येणारी वाहने धुळे, शिऊर, देवगाव, कसाबखेडा फाटामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील.
-छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटामार्गे कन्नडकडे जातील.
-धुळ्याकडे जाणारी वाहने कसाबखेडा फाटा, देवगाव रंगारी शिऊरमार्गे पुढे जातील.
-फुलंब्रीकडून कन्नडकडे जाणारी वाहतूक छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी कसाबखेडा फाटामार्गे कन्नडकडे जाईल.
-फुलंब्रीकडून धुळ्याकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, कसाबखेडा फाटा, देवगाव रंगारी शिऊरमार्गे पुढे जातील.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
25 Jul 2025 22:12:45
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्त्याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्डा...