उभ्या ट्रकला दुचाकी धडकून माजी ग्रामपंचायत सदस्यांचा मृत्‍यू, सिल्लोडची दुर्दैवी घटना

कन्‍नडमध्ये आयशरची ऑटोरिक्षाला धडक, २ महिला गंभीर

On

सिल्लोड/कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : सिल्लोड तालुक्‍यातील लिहाखेडी येथे उभ्या ट्रकला दुचाकी धडकून माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृत्‍यू झाला, तर कन्‍नड तालुक्‍यातील करंजखेड येथे आयशरच्या धडकेने ऑटोरिक्षातील २ महिला गंभीर जखमी झाल्या.

घटना पहिली : सिल्लोड लिहाखेडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा लक्ष्मण फरकाडे (वय ४४) सिल्लोड -अजिंठा रस्त्याने गोळेगावहून लिहाखेडीला येत होते. लिहाखेडी शिवारात उभ्या ट्रकला दुचाकी मागून धडकली. यात फरकाडे यांचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना मंगळवारी (२ सप्‍टेंबर) रात्री १० च्या सुमारास घडली. गावकऱ्यांनी त्यांना तत्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

घटना दुसरी : बुधवारी (३ सप्टेंबर) सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास  करंजखेड-नागापूर मार्गावर करंजखेड (ता. कन्‍नड) येथे आयशर वाहनाने ऑटो रिक्षाला उडवले. यात रिक्षातील दोन महिला गंभीर जखमी झाल्या. प्रतिभा बाळासाहेब पवार व विमलताई ताजणे (रा. करंजखेड) अशी गंभीर जखमी महिलांची नावे आहेत. तिघांना किरकोळ मार लागला आहे. नागापूर येथून रिक्षाने ४ महिला व रिक्षाचालक असे पाचजण करंजखेडला घरी येत होते. करंजखेड गावाजवळील वळणावर करंजखेडकडून नागापूरकडे अद्रक भरण्यासाठी सुसाट निघालेल्या आयशरने रिक्षाला उडवले. रिक्षाने तीन पलट्या खाल्ल्या. प्रतिभा पवार आणि विमलताई ताजणे यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अन्य ३ जखमींवर कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले. अपघातानंतर ग्रामस्थांनी आयशर चालकाला पकडून पिशोर पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह)

Latest News

बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह) बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खासदारकी नसली तरी अजूनही चंद्रकांत खैरे हे खासदार असल्यासारखेच वावरत असतात. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचा मान...
Tech News : फोन चार्जिंग करताना वापरत असाल तर सावधान!
Beauty Feature : आता घरीच करा हेअर स्पा!; पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, १०० रुपयांत हजार रुपयांचे काम होतील
Adhyatm : चंद्रग्रहणाने सुरू होतेय श्राद्ध; जाणून घ्या ग्रहणात श्राद्ध तर्पणचा नियम काय?
एका युवकासोबतची छायाचित्रे व्हायरल झाल्याने महिला हादरली!; सायबर पोलिसांनी शोधून काढले बदनामी करणारे दोघे!, छ. संभाजीनगरची धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software