- Marathi News
- जिल्हा न्यूज
- खुलताबादच्या कोहिनूर महाविद्यालयात संघर्ष पेटला!; संस्थाचालक-प्राध्यापकांतील वादाने घेतले वेगळे वळण....
खुलताबादच्या कोहिनूर महाविद्यालयात संघर्ष पेटला!; संस्थाचालक-प्राध्यापकांतील वादाने घेतले वेगळे वळण...
On

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापकांशी संस्थाचालकांच्या सुरू असलेल्या संघर्षाने आता आणखी एक वेगळे वळण घेतले आहे. संस्था अध्यक्ष डॉ. मजहर खान हे खुलताबाद पोलिसांच्या अटकेत असताना प्राचार्यांना त्यांनी फोनवरून खंडणी मागितल्याचे समोर आले होते. आता डॉ. खान हे कारागृहातून बाहेर आले असून, त्यांनी प्राचार्य कमरुन्निसा बेगम इक्रामोद्दीन शेख यांना निलंबित केले. ही कारवाई नियमबाह्य झाल्याचा दावा करत ५५ पेक्षा अधिक प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयासमोरच रविवारी (१७ ऑगस्ट) उपोषण केले.
संस्थाध्यक्ष मजहर खान, सचिव आस्मा खान, सहसचिव मकसूद खान यांचे अधिकार गोठवावेत. महाविद्यालयावर तत्काळ प्रशासक नेमावा. प्राचार्यांचे नियमबाह्य निलंबन रद्द करावे. माजी प्राचार्य शंकर अंभोरे यांच्या काळातील कारभाराची चौकशी व्हावी. कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका गहाळ केल्याच्या प्रकरणात संस्थाचालकासह इतरांवर गुन्हे दाखल करावेत, अशा ९ मागण्या प्राध्यापकांनी उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. त्यामुळे आता हा संघर्ष कोणत्या वळणार जातो, उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठ यात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मजुराच्या मुलीचे मिसारवाडीतून अपहरण, सिडको पोलिसांकडून शोध सुरू
By City News Desk
पावसाळ्यात ब्युटी डाएट प्लॅन फॉलो करा अन् कियारासारखे सौंदर्य मिळवा...
By City News Desk
चष्मा हटवायचा? रोज हे माउथ फ्रेशनर खा, चमत्कारापेक्षा कमी नाही!
By City News Desk
Latest News
18 Aug 2025 21:14:46
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विवाहित प्रियकराचा साथीदारांच्या मदतीने खून करून मृतदेह गोदापात्रात फेकल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आल्याने...