मजुराच्या मुलीचे मिसारवाडीतून अपहरण, सिडको पोलिसांकडून शोध सुरू

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मजुराच्या १५ वर्षीय मुलीचे मिसारवाडीतून अपहरण झाले आहे. मध्यरात्री तिला घरातून पळवून नेण्यात आले. ही बाब शुक्रवारी (१५ ऑगस्ट) पहाटे दीडला (मध्यरात्री) समोर आली. सिडको पोलिसांनी अपहरणकर्त्याविरुद्ध शनिवारी (१६ ऑगस्ट) गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.

मजुराच्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री ११ ला घरातील सर्वजण झोपी गेले. मध्यरात्रीनंतर दीड वाजता मजूर बाथरूमसाठी उठला असता त्‍यांची १५ वर्षीय मुलगी अंथरुणावर दिसली नाही. त्यांनी पत्नीला व मुलांना झोपेतून उठवले. सर्वांनी मुलीचा शोध सुरू केला. परिसरात व नातेवाइकांकडे विचारणा केली. मात्र ती मिळून आली नाही. तिचे कोणीतरी अपहरण केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. मुलीने जाताना मोबाइल सोबत नेला आहे.  अधिक तपास पोलीस अंमलदार एकनाथ चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छ. संभाजीनगरमध्ये खळबळ : प्रेयसीनेच विवाहित प्रियकराचा खून करून मृतदेह फेकला गोदापात्रात!; तो हर्सूलचा, ती सिडकोतील कॅनॉट प्लेसची...  प्रेयसीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल!

Latest News

छ. संभाजीनगरमध्ये खळबळ : प्रेयसीनेच विवाहित प्रियकराचा खून करून मृतदेह फेकला गोदापात्रात!; तो हर्सूलचा, ती सिडकोतील कॅनॉट प्लेसची...  प्रेयसीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल! छ. संभाजीनगरमध्ये खळबळ : प्रेयसीनेच विवाहित प्रियकराचा खून करून मृतदेह फेकला गोदापात्रात!; तो हर्सूलचा, ती सिडकोतील कॅनॉट प्लेसची...  प्रेयसीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विवाहित प्रियकराचा साथीदारांच्या मदतीने खून करून मृतदेह गोदापात्रात फेकल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आल्याने...
खळबळजनक : सिद्धार्थच्या हत्‍येनंतर आता चुलतभाऊ स्वप्नीलचा मृतदेह विहिरीत आढळल्‍याने गंगापूर हादरले!
गावात कोणासोबतही बोलते, घराची इज्‍जत घालवतेस म्हणत ३८ वर्षीय महिलेला फाशी देण्याचा प्रयत्‍न!; पती, मुलगा, पुतणे, भाया, सासूचे कृत्‍य, वैजापूर तालुक्‍यातील वाकला येथील खळबळजनक घटना 
मजुराच्या मुलीचे मिसारवाडीतून अपहरण, सिडको पोलिसांकडून शोध सुरू
दहीहंडी कार्यक्रमात चोरट्यांची हातचलाखी, दोन महिलांचे मंगळसूत्र लांबवले!; टीव्ही सेंटरवरील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software