- Marathi News
- जिल्हा न्यूज
- खळबळजनक : सिद्धार्थच्या हत्येनंतर आता चुलतभाऊ स्वप्नीलचा मृतदेह विहिरीत आढळल्याने गंगापूर हादरले!
खळबळजनक : सिद्धार्थच्या हत्येनंतर आता चुलतभाऊ स्वप्नीलचा मृतदेह विहिरीत आढळल्याने गंगापूर हादरले!
On

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : चक्रावून टाकणाऱ्या घटना लागोपाठ गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगावमध्ये घडल्या आहेत. १४ ऑगस्टला सिद्धार्थ विजय चव्हाण (वय १२) याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकण्यात आला होता. त्यानंतर चारच दिवसांत त्याचा चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण (वय २३) याचाही मृतदेह आज, १८ ऑगस्टला दुपारी परिसरातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
सिद्धार्थच्या हत्येप्रकरणी त्याची आई सुरेखा विजय चव्हाण (वय ४०, रा. हकीकतपूर वस्ती, मुद्देशवाडगाव) यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी (१५ ऑगस्ट) खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सिद्धार्थ गुरुवारी (१४ ऑगस्ट) दुपारी तीनला किराणा सामान आणण्यासाठी शेतवस्तीवरून मुद्देशवाडगाव गावाकडे सायकलने जात होता. त्यावेळी खुन्याने त्याला दत्तू भुसारे यांच्या मकाच्या शेतात नेले. तिथे सिद्धार्थच्या डोक्यात मारून व गळा दाबून ठार केले. नंतर मृतदेह भरत दारूंटे यांच्या विहिरीतील पाण्यात फेकून दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. या खुनाच्या गुन्ह्याचा तपास अद्याप पूर्णत्वास गेला नसतानाच आता स्वप्नीलचा मृतदेह आढळला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मजुराच्या मुलीचे मिसारवाडीतून अपहरण, सिडको पोलिसांकडून शोध सुरू
By City News Desk
पावसाळ्यात ब्युटी डाएट प्लॅन फॉलो करा अन् कियारासारखे सौंदर्य मिळवा...
By City News Desk
चष्मा हटवायचा? रोज हे माउथ फ्रेशनर खा, चमत्कारापेक्षा कमी नाही!
By City News Desk
Latest News
18 Aug 2025 21:14:46
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विवाहित प्रियकराचा साथीदारांच्या मदतीने खून करून मृतदेह गोदापात्रात फेकल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आल्याने...