- Marathi News
- जिल्हा न्यूज
- शेतात पुलाचा काही भाग; शेतकरी-अभियंत्यात जुंपली, धक्काबुक्की होताच शेतकऱ्याने पिले विष!, कन्नडची ध...
शेतात पुलाचा काही भाग; शेतकरी-अभियंत्यात जुंपली, धक्काबुक्की होताच शेतकऱ्याने पिले विष!, कन्नडची धक्कादायक घटना
On

कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जालिंदर सोनवणे आणि शेतकरी कृष्णा मोकासे यांच्यात मंगळवारी (२२ जुलै) सकाळी ११:३० च्या सुमारास जुंपली. वाद वाढून सोनवणे यांनी कारवाईची धमकी दिल्याने संतप्त शेतकऱ्याने तिथेच विष पिले. आपल्या शेतात पुलाचा काही भाग येत असल्याने शेतकरी मोकासे आक्रमक झाले होते. दोघांची झटापटही झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे शेतकऱ्याला गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रकरण अंगलट आल्याने सोनवणे यांचाही रक्तदाब वाढला. त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
पिशोर- कोळंबी रस्त्यावरील अंजना नदीवर पिशोरजवळ पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. पिशोर गावाकडील थोडे काम बाकी आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराला कनिष्ठ अभियंता सोनवणे यांच्या उपस्थितीत काम सुरू असताना शेतकरी कृष्णा मोकासे हे त्यांचे भाऊ नारायण मोकासे, दिलीप मोकासे, पुतण्या जितेंद्र नारायण मोकासे, मुलगा हर्षल कृष्णा मोकासे यांच्यासह कामाच्या ठिकाणी आले. आपल्या शेतात पुलाचा काही भाग येत असल्याचे त्यांनी सोनवणेंना सांगितले. यातून दोघांत वाद सुरू झाला. कारवाईची धमकी आणि एकमेकांना शिवीगाळ सुरू होऊन अचानक झटापट सुरू झाली. त्यामुळे संतप्त कृष्णा यांनी विष पिले. त्यामुळे सोनवणे यांचाही रक्तदाब वाढला. पोलिसांनी तातडीने कृष्णा मोकासे यांना पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथून छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
मंगळवारी रात्री आठला कनिष्ठ अभियंता प्रवीण हिवराळे यांनी पिशोर पोलीस ठाण्यात शेतकरी कृष्णा विठ्ठल मोकासे, त्यांचे भाऊ नारायण मोकासे, दिलीप मोकासे, पुतणे जितेंद्र मोकासे, मुलगा हर्षल मोकासे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. शासकीय कामात अडथळा, धक्काबुक्की व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात अद्याप शेतकऱ्यांकडून तक्रार आलेली नाही. त्यांच्या तक्रारीवरून सोनवणेंविरुद्धही गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार परमेश्वर दराडे, वसंत पाटील, विलास सोनवणे, व्ही. एस. भोटकर करत आहेत. या घटनेमुळे कन्नड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
25 Jul 2025 22:12:45
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्त्याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्डा...