नापिकीला कंटाळून ३२ वर्षीय युवकाची आत्‍महत्‍या, पैठण तालुक्‍यातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सततच्या नापिकीला कंटाळून रजापूर (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी सोनू मोहन गोर्डे (वय ३२) यांनी स्वतःच्या आडूळ शिवारातील शेतातील विहिरीत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (१६ सप्‍टेंबर) रात्री ९ च्या सुमारास समोर आली.

सोनू गोर्डे यांच्या कुटुंबाचा अडीच एकर शेतीवर उदरनिर्वाह सुरू होता. काही वर्षांपासून शेतातील नापिकीमुळे उत्पन्न होत नसल्याने ते निराश होते. याच नैराश्यातून मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजता ते एकटेच घराबाहेर पडले. तसे घरी परतलेच नाही. रात्री उशीर होऊनही ते घरी न आल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला. रात्री ९ वाजता विहिरीजवळ विषाची बाटली दिसल्याने ग्रामस्थांनी विहिरीत शोध घेतला असता सोनू गोर्डे दिसून आले.

त्यांना बाहेर काढून आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. घटनेची नोंद पाचोड पोलिसांनी घेतली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रणजितसिंग दुल्हत करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software