- News
- जिल्हा न्यूज
- या दोन आत्महत्या तुमचा संताप वाढवतील..!; फुलंब्री, गंगापूरच्या घटना
या दोन आत्महत्या तुमचा संताप वाढवतील..!; फुलंब्री, गंगापूरच्या घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर/ फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतात वारंवार पाणी साचत असल्याने वैतागलेल्या माजी सरपंच शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१२ सप्टेंबर) सकाळी दिवशी पिंपळगाव (ता. गंगापूर) येथे घडली. अरुण भाऊसाहेब वावरे (वय ५८) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वावरे यांची छत्रपती संभाजीनगर-नांदगाव मार्गाला लागून दिवशी पिंपळगावच्या जवळच गट क्रमांक […]
गंगापूर/ फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतात वारंवार पाणी साचत असल्याने वैतागलेल्या माजी सरपंच शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१२ सप्टेंबर) सकाळी दिवशी पिंपळगाव (ता. गंगापूर) येथे घडली. अरुण भाऊसाहेब वावरे (वय ५८) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
दुसऱ्या घटनेत खामगाव गोरक्ष (ता. फुलंब्री) येथील ३५ वर्षीय बारकू सांडू सोनवणे या शेतकऱ्याने मराठा आरक्षणासाठी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१२ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. बारकू सोनवणे हे अल्पभूधारक शेतकरी असून, जिल्हा बँकेत साफसफाईचे काम करत होते. घरातील सदस्य बाहेर गेले असता त्यांनी लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. त्यांची पत्नी घरी आल्यावर त्यांना बाळू यांनी गळफास घेतल्याचे पाहिले अन् हंबरडा फोडला. बाळू यांना तत्काळ फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. बारकू सोनवणे यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली आहे. त्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे लिहिलेले आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे करीत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

